सैन्यात असलेल्या साडेचार हजार तोफा अत्याधुनिक करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी नियोजन केले होते; मात्र त्याची आता सुरुवात होत आहे. येथील ‘भारत फोर्ज (Bharat Forge) आस्थापना’ला ३०७ अत्याधुनिक तोफखाना (आर्टिलरी, Artillery) निर्मिती करण्याचे काम दिले आहे. त्या दृष्टीने जेजुरी येथे नवीन प्रकल्प लवकर चालू होईल.
(हेही वाचा – रामनवमीच्या पार्श्वभूमीवर West Bengal मध्ये तणाव ; समाजकंटकांनी मंडप, मूर्तींना लावली आग)
रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) जगाला पुन्हा एकदा तोफांचे महत्त्व समजले आहे. ‘आगामी युद्ध हे केवळ सायबर युद्ध होईल’, असे म्हणणार्या लोकांनाही तोफखान्याचे महत्त्व कळाले, असे मत नामांकित उद्योजक बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले.
आगामी काळात संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादनात भारताला मोठी संधी आहे. वर्ष २०३० पर्यंत आर्टिलरी क्षेत्रात जगात सर्वाधिक प्रमाणात अर्टिलरी निर्मिती करण्याचे लक्ष आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा (Artificial intelligence, एआय) वापर संरक्षण क्षेत्रात वाढत असून त्याच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भारत फोर्ज’मध्ये प्रयोगशाळा चालू केली आहे.
संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) भारत फोर्ज लिमिटेड आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (Tata Advanced Systems Limited) यांच्याशी अनुक्रमे 155 मिमी/52 कॅलिबर अॅडव्हान्स्ड टॉव आर्टिलरी गन सिस्टीम्स (एटीएजीएस) आणि हाय मोबिलिटी व्हेइकल 6×6 गन टो व्हीकल्स खरेदी करण्यासाठी सुमारे 6,900 कोटी रुपयांचे करार केले आहेत.
नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत या करारांना औपचारिक स्वरूप देण्यात आले, जे भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या स्वाक्षरीसह, संरक्षण मंत्रालयाचे आर्थिक वर्ष 2024-25 साठी संचयी भांडवली खरेदी करार आता 1.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community