केंद्र सरकारच्या (Central government) मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने बर्ड फ्लू (H5N1) (bird flu) संदर्भात पंजाबसह 9 राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूने भारतात प्रवेश केला आहे जे लोक संक्रमित चिकन खातात त्यांना विषाणूची लागण होऊ शकते, असे मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय (Alka Upadhyay) यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. (bird flu)
हेही वाचा-Mark Carney कॅनडाचे नवे पंतप्रधान ; भारत-कॅनडा संबंधावर केलं मोठ वक्तव्य !
‘जानेवारी 2025 पासून, सरकारी मालकीच्या पोल्ट्री फार्मसह 9 राज्यांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सर्व सरकारी, व्यावसायिक आणि घरामागील कुक्कुटपालनांना जैवसुरक्षा उपाय मजबूत करावे लागतील.’ असे मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. (bird flu)
सर्व शासकीय पोल्ट्री फार्मचे जैवसुरक्षा लेखापरीक्षण लवकरात लवकर करून त्यात उणिवा तातडीने दूर करण्यात याव्यात, असे केंद्र शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, जैवसुरक्षा प्रोटोकॉलचे कठोर पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि असामान्य मृत्यूची वेळेवर अहवाल देण्यासाठी पोल्ट्री फार्म कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम सुरू केले जावेत, असेही त्यात नमूद करण्यात आलं आहे. राज्यांनी एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजनेचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे. त्या अंतर्गत जलद प्रतिसाद पथके सक्रिय करा आणि पशुवैद्यकीय आणि प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष दिल्यास एव्हीयन फ्लूचा प्रसार रोखण्यात मदत होईल, असे केंद्राने म्हटले आहे. (bird flu)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community