- ऋजुता लुकतुके
भारताने आपल्या तंत्रज्ञानाने बनवलेल्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांचा पहिला हफ्ता फिलिपिन्स देशाला शुक्रवारी निर्यात केला. दोन वर्षांपूर्वी भारत आणि फिलिपिन्स दरम्यान ३७५ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा करार झाला होता. ही क्षेपणास्त्र फिलिपिन्सला कशी पोहोचवली ते पाहणंही मजेशीर होतं. भारतीय हवाई दलातील सी-१७ ग्लोबमास्टर या सामानाची वाहतूक करणाऱ्या कार्गो विमानातून ही क्षेपणास्त्र फिलिपिन्सला पाठवण्यात आली. हा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेनं प्रसारित केला आहे. (BrahMos Export)
२०२२ च्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीचा करार उघड केला होता. या करारानुसार, भारत फिलिपिन्सला या क्षेपणास्त्रांसोबत यंत्रणेला लागणाऱ्या तीन बॅटरी आणि ही यंत्रणा चालवण्यासाठी प्रशिक्षणही देणार आहे. (BrahMos Export)
#WATCH | BrahMos supersonic cruise Missiles delivered to the Philippines by India today. The two countries had signed a deal worth USD 375 million in 2022. https://t.co/8dOvYugj0w pic.twitter.com/C1wWACHDAA
— ANI (@ANI) April 19, 2024
(हेही वाचा – Piyush Goyal मनोरीतील मच्छिमारांना भेटले; तेव्हा मात्र तोंडाला लावला नाही रुमाल)
ब्राम्होस क्षेपणास्त्र ‘या’ कंपनीने केली विकसित
भारताची ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी संरक्षण सामुग्रीची निर्यात ऑर्डर आहे. ब्राम्होस यंत्रणा कशी कार्यान्वित करायची याचं प्रशिक्षण फेब्रुवारी २०२३ मध्ये भारताने फिलिपिन्सच्या २१ जणांना दिलेलं आहे. यंत्रणेच्या देखभालीचं कामही या प्रशिक्षणाचा भाग होतं. (BrahMos Export)
ब्राम्होस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या ब्राम्होस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विकसित केली आहेत. यातील सुपरसॉनिक क्षेपणास्त्र ही या श्रेणीतील जगभरात नावाजलेली आणि प्रभावी क्षेपणास्त्रं मानली जातात. जमिनीवरून जमिनीवर किंवा पाण्यातून जमिनीवर मारा करू शकतील अशी ही क्षेपणास्त्र आहेत. आणि ती जमिनीवर तसंच पाण्यात पाणबुडीवरही बसवली जाऊ शकतात. २९० किलोमीटर दूरचं लक्ष्य ते भेदू शकतात. (BrahMos Export)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community