Indian Military ने सिक्कीममध्ये वाचवले ५०० जणांचे प्राण; बर्फवृष्टीत अडकलेले पर्यटक

सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरील नाथुला येथे जोरदार हिमवृष्टीमुळे अडकलेल्या ५०० हून अधिक पर्यटकांची लष्कराने बुधवारी सुटका केली.

212
भारतीय लष्कर (Indian Military) प्रत्येक वेळी आपली ताकद सिद्ध करताना दिसत आहे. शत्रूंपासून देशाला वाचवायचे असो किंवा देशवासीयांना संकटातून वाचवायचे असो, लष्कर नेहमीच आघाडीवर असते. असाच आणखी एक पराक्रम या शूर सैनिकांनी केला, ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून बर्फात अडकलेल्या ५०० लोकांना सुखरूप वाचवले.

भारत-चीन सीमेवर सिक्कीममधील नाथुला येथे मुसळधार बर्फवृष्टीमुळे येथे अडकलेल्या ५०० हून अधिक पर्यटकांची बुधवारी सुटका करण्यात आली. लष्कराने (Indian Military) अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. पूर्व सिक्कीममध्ये अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ५०० अधिक पर्यटकांची लष्कराच्या (Indian Military) त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांनी सुटका केली.

 

(हेही वाचा मुंबईच्या रस्त्यांवर राजकीय पक्षांनी तब्बल १० हजार बेकायदा फलक लावले; Bombay High Court संतापले; सगळ्या पक्षांना बोलावले)

सैनिक अडकलेल्या पर्यटकांची सुटका करत आहेत

निवेदनात म्हटले आहे की, अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांना तेथे पाठवण्यात आले होते. पर्यटकांना गरम जेवण आणि तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली आणि त्यांना सुरक्षित वाहतूक पुरवण्यात आली. त्रिशक्ती कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर काही संबंधित फोटोही शेअर केले आहेत.
पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘अचानक मुसळधार हिमवृष्टीमुळे नाथुलामध्ये ५०० हून अधिक पर्यटकांना घेऊन जाणारी सुमारे १७५ वाहने अडकली आहेत. त्रिशक्ती कॉर्प्सचे जवान शून्य तापमानात घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली. औषधे, गरम अन्न आणि सुरक्षित वाहतुकीची तातडीने व्यवस्था करण्यात आली. हिमालय सीमेचे रक्षण करणारी त्रिशक्ती कॉर्प्स पर्यटक आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.