ब्राझीलच्या नौदल शिष्टमंडळाने दिली भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाला भेट

167

ब्राझीलच्या नौदल शिष्टमंडळाने व्हाइस ॲडमिरल लिबरल एनियो झानेलट्टो, औद्योगिक उत्पादन आणि अभियांत्रिकी संचालक यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे पश्चिम विभाग प्रमुख, ध्वजाधिकारी, ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांची 11 जुलै रोजी भेट घेतली.

उभय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समान हिताच्या विविध मुद्यांवर यावेळी चर्चा केली. संरक्षण आणि पाणबुडी तंत्रज्ञान, मेक इन इंडिया, नौदलांमधील व्यावसायिक सहकार्यासाठी पुढाकार आणि सर्व समान विचारसरणीच्या नौदल/राष्ट्रांसोबत सामायिक सागरी हितसंबंधांसाठी भारतीय नौदलाचा दृष्टिकोन आदी मुद्यांचा यात समावेश होता.

(हेही वाचा  – Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात ‘या’ पदांवर भरती, दरमहा 2 लाखांहून अधिक पगार)

ब्राझीलच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांच्या भेटीदरम्यान, भारतीय नौदलाच्या समकक्षांसोबत पाणबुडी देखभाल केंद्रित विस्तृत चर्चा केली. शिष्टमंडळाने या दौऱ्यात माझगाव डॉक्स शिपबिल्डर्स लिमिटेड आणि भारतीय नौदलाच्या कलवरी (स्कॉर्पिन) श्रेणीच्या पाणबुडीलाही भेट दिली. ब्राझिलच्या नौदलाकडेही 4 स्कॉर्पिन श्रेणीच्या पाणबुड्या आहेत आणि डिझेल-इलेक्ट्रिक अटॅक पाणबुड्यांच्या देखभालीसाठी सहकार्य पर्यायाच्या ते शोधात आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.