त्रिपुराच्या सीमेवरून बांगलादेशातून भारतीय हद्दीत घुसखोरीकरणाऱ्या १५ बांगलादेशी नागरिकांना BSF ने अटक केली. एका गुप्त माहितीच्या आधारे, बीएसएफने दोन वेगवेगळ्या कारवाईत सात मुलांसह १५ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यासोबतच तीन भारतीय दलालांनाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे BSF ने ही कारवाई केली आहे. बीएसएफने सीमावर्ती भागात सापळा रचला आणि नंतर बांगलादेशातील मौलवीबाजार, सुनामगंज, नेत्रकोना आणि बारिशाल जिल्ह्यातील नागरिकांना अटक केली. गुरुवारी उनाकोटी जिल्ह्यातील कैलाशहर येथे केलेल्या कारवाईत आंतरराष्ट्रीय सीमेवरून बांगलादेशातील तीन पुरुष, तीन महिला आणि सात मुलांना अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(हेही वाचा Nashik मध्ये संस्कृत विश्वविद्यालय होण्यासाठी महंत अनिकेत शास्त्रींच्या प्रयत्नांना यश)
अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की BSF ने तीन भारतीय दलालांनाही अटक केली आहे. हे दलाल बांगलादेशींना भारतीय हद्दीत प्रवेश करण्यास मदत करत असल्याचा आरोप आहे. शुक्रवारी, बीएसएफने दुसऱ्या ठिकाणी छापा टाकून आणखी दोन बांगलादेशींना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही बांगलादेशी त्यांच्या देशात परतण्यासाठी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडण्यात आले. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, दुसऱ्या एका कारवाईत, बीएसएफने जीआरपीसोबत आगरतळा स्थानकावर छापा टाकला आणि दोन भारतीयांना अटक केली. त्यांच्यावर शेजारच्या देशात बेकायदेशीरपणे वस्तूंची वाहतूक करण्याचा आरोप आहे.
Join Our WhatsApp Community