भारत-बांगलादेश सीमेवर तणाव वाढला; बीएसएफचा जवान हुतात्मा

107

त्रिपुरामधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचा एक जवान हुतात्मा झाला आहे. गिरीजेश कुमार असे या जवानाचे नाव आहे. चकमकीत गंभीर जखमी झालेल्या गिरीजेश कुमारला उपचारासाठी आगरतला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

( हेही वाचा : दादर स्थानकाबाहेर शक्तीप्रदर्शन करण्यास शिवसेना रंगली, तिकडे शाखेबाहेरच भाजपने बांधली हंडी )

यासंदर्भात बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 145 बीएन बीएसएफ, सेक्टर पानीसागर आणि त्रिपुराच्या बीएसएफ गस्ती दलावर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. बीएसएफच्या जवानांनी देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. बीएसएफच्या प्रत्युत्तरानंतर अतिरेकी घनदाट जंगलात पळून गेले. परंतु, या चकमकीत गिरजेश कुमार यांना गोळ्या लागल्या. त्यामुळे त्यांना तत्काळ हेलिकॉप्टरने आगरतला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले, गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार सुरू असताना गिरीजेश कुमार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

New Project 2 14

दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचनपूर उपविभागातील सीमा-2 चौकी परिसरात बीएसएफच्या एका पथकाची शोध मोहीम सुरू असताना बांगलादेशकडून गोळीबार सुरू झाला. पोलीस अधीक्षक किरण कुमार यांनी सांगितले की, ‘बांगलादेशातील रंगमती हिल्स जिल्ह्यातील जुपुई भागातून जोरदार सशस्त्र दहशतवाद्यांनी बीएसएफ जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत एका बीएसएफ जवान गिरीजेश कुमार यांना 4 गोळ्या लागल्यामुळे ते हुतात्मा झाले. या घटनेनंतर भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसरात शोधमोहीमही तीव्र करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.