BSF ने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न

106

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी रविवारी रात्री जम्मूच्या बाहेरील अरनिया सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ काही घुसखोर भारतीय सीमेत घुसताना पाहिले. सैनिकांनी त्यांना परत जाण्यास सांगितले. पण तरीही ते  घुसखोर  भारतीय हद्दीत घुसू लागले. हा सर्व प्रकार पाहून जवानांनी गोळीबार सुरू केल्यानंतर ते पळून गेले.

याबाबत आज, सोमवारी माहिती देताना बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, बीएसएफच्या जवानांनी काही घुसखोरांना अरनिया सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून प्रवेश करताना पाहिले. सतर्क असलेल्या बीएसएफच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि गोळीबारानंतर ते पळून गेले. सोमवारी सकाळी जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

( हेही वाचा: पुण्यात जिवंत काडतुसे आणि बुलेट सापडली; पंतप्रधानांच्या दौ-यापूर्वी पोलिसांची कारवाई )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.