सीमेवर पाकिस्तान आणि चीनच्या कुरघोड्या सुरूच आहेत. अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी मोठं बूस्टर मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पेत संरक्षण क्षेत्रासाठी घोषणा करताना ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’वर अधिक भर देत असल्याचे म्हटले. यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण क्षेत्रात तब्बल 10 टक्क्यांनी वाढ केल्याचे समोर आले आहे.
संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत उद्योगांवर अधिक भर देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणे निर्मितीसाठी मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्डच्या घोषणेवर जोर देण्यात आला आहे.
68% of the capital procurement budget for Defence to be earmarked for domestic industry to promote Aatmanirbharta and reduce dependence on imports of defence equipment. This is up from the 58% last fiscal: FM Nirmala Sitharaman#Budget2022 pic.twitter.com/pQJm3ymlQE
— ANI (@ANI) February 1, 2022
अशा आहेत संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद
- आत्मनिर्भरताला चालना देण्यासाठी आणि संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी संरक्षणासाठी भांडवली खरेदी बजेटच्या 68% रक्कम देशांतर्गत उद्योगासाठी राखून ठेवली जाईल. हे गेल्या आर्थिक वर्षाच्या 58% पेक्षा जास्त आहे, अशी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली.
- संरक्षण उत्पादन खरेदीकरिता आत्मनिर्भर योजनेला प्रोत्साहन
- संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी 25 टक्के बजेटची तरतूद सरकारकडून केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. सीमांवर अतिरिक्त परिस्थिती असल्याने या अर्थसंकल्पात संरक्षणावर अधिक लक्ष दिले जात आहे.
(हेही वाचा -Budget 2022: तरूणांना दिलासा! 60 लाख नव्या रोजगाराच्या संधी)
रिसर्च आणि डेव्हलेपमेंटसाठी 25 टक्के रक्कम खर्चासाठी
यावेळी अशीही घोषणा कऱण्यात आली की, संरक्षण क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी संशोधनावरही जोर देण्यात आला आहे. डीआरडीओला 25 टक्के अधिक निधी देण्यात येणार आहे. डीआरडीओला देण्यात येणारी 25 टक्के रक्कम ही जलदपणे रिसर्च आणि डेव्हलेपमेंटसाठी खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community