2019 साली झालेल्या पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांनी ज्या रसायनांचा वापर केला होता. त्याची खरेदी अॅमेझॅानच्या संकेतस्थळावरुन करण्यात आली होती. या रसायनांचा वापर करुन दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोसिव्ह तयार केले. असा खळबळजनक दावा कॅान्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजेच सीएआयटीने केला आहे. दहशतवादी अशी स्फोटके मागवण्यासाठी अॅमेझॅान कंपनीचा वापर करत आहेत. अशा कंपन्यांची चौकशी होत नसल्याने, त्यांच्यावर संशय घेतला जात नसल्याने हा नवा मार्ग आता दहशतवाद्यांनी अवलंबला आहे.
अमोनियम नायट्रेट खरेदी
पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ज्या दोन दहशतवाद्यांना स्फोटके खरेदी करण्याबाबत अटक करण्यात आली, त्यांनी ही स्फोटके आपण अॅमेझॅानवरुन खरेदी केल्याचे सांगितले. या दहशतवाद्यांनी अॅमेझॅानवरुन भारतात बंदी असलेले अमोनियम नायट्रेड खरेदी केले होते.
अॅमेझॅान कंपनीचे कायदेशीर नियम अस्पष्ट
2019 मध्ये सीआरपीएफच्या जवानांवर जो आत्मघाती हल्ला झाला, त्यासाठी वापरली गेलेली स्फोटके ही अॅमेझॅानवरुन मागवण्यात आली होती. तसेच अफू, गांजा आणि चरस यांसारखे पदार्थसुद्धा अॅमेझॅानच्या माध्यमातून खरेदी करण्यात येत आहेत. अ्ॅमेझॅानसारख्या संकेतस्थळांवरुन ऑर्डर केलेल्या वस्तूंवर कोणी संशय घेत नसल्याने दहशतवादी या संकेतस्थळावरुन अशा आत्मघातकी वस्तू सर्रास मागवतात. दुर्दैवाने या अॅमेझॅान कंपनीवर कायदेशीर नियम अस्पष्ट आहेत. त्यामुळे ते स्पष्ट करणं आवश्यक आहे. अशा कंपन्या काय घेऊन जाऊ शकतात, काय नाही हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. असं निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी म्हटलं आहे.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
सीएआयटीचे अध्यक्ष बी.सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवार यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांनी अॅमेझॅानवरुन आयईडी, बॅटरी आणि अन्य सामान खरेदी केल्याचे मान्य केले. आमच्या जवानांविरोधात लढण्यासाठी दहशतवाद्यांनी प्रतिबंधित सामुग्री अमोनियम नायट्रेड ऑनलाईन माध्यमातून सहजपणे खरेदी केले. तसेच त्याचा वापर देशाविरोधात केला. त्यामुळे हे पदार्थ विकणा-या अॅमेझॅानविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही सीएआयटीने केली आहे.
(हेही वाचा : लग्न सराईतील जेवणाची पंगतही महागली! ताटाची किंमत ‘इतकी’ झाली )
Join Our WhatsApp Community