Pakistan : पाकिस्तान खरंच विकू शकतो अणुबॉम्ब? असे केल्यास किती मिळणार पैसे?

आयएसआयच्या जवळचे मानले जाणारे जैद हामिद यांनी पाकिस्तानला आर्थिक मंदीपासून वाचवायचे असेल तर अणुबॉम्ब विकले पाहिजेत, असे म्हटले आहे.

252

पाकिस्तान सध्या अत्यंत वाईट आर्थिक मंदीच्या परिस्थितीला तोंड देत आहे. यामुळे पाकिस्तानी सेना आणि आयएसआयच्या जवळचे मानले जाणारे जैद हामिद यांनी पाकिस्तानला आर्थिक मंदीपासून वाचवायचे असेल तर अणुबॉम्ब विकले पाहिजेत, असे म्हटले आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितले आहे की, सौदी अरेबीया आणि तुर्कीसारखे देश अणुबॉम्बच्या बदल्यात लाखो डॉलर देत आहे.

आता राहिला प्रश्न की, जर अणुबॉम्ब विकला तर पाकिस्तानला किती पैसे मिळतील? जैद हामिदने आपल्या व्हिडीओमध्ये सौदी अरेबीया पाच अणुबॉम्बच्या बदल्यात एका तासांत २५ अरब डॉलर देऊ शकतो, असा दावा केला आहे. तुर्कीसुद्धा तेवढ्याच अणुबॉम्बच्या बदल्यात २० अरब डॉलर देऊ शकतो.

(हेही वाचा Akhand Bharat : अखंड भारताच्या कलाकृतीवरून पाक, नेपाळ, बांगलादेशला पोटदुखी; भारताने चांगलेच सुनावले )

किती पैसे कमाऊ शकतो पाकिस्तान?

जैद हामिदने केलेल्या दाव्याची सत्यता पडताळली तर पाकिस्तानच्या ५ अणुबॉम्बची किंमत २५ अरब डॉलर इतकी होईल. अशा प्रकारे २० अणुबॉम्बची किंमत १०० अरब डॉलर इतकी होईल. जर त्यांनी ४० अणुबॉम्ब विकले तर २०० अरब डॉलर कमाऊ शकतात. ही रक्कम पाकिस्तानला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी मदत करेल. पाकिस्तानला 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त विदेशी कर्जाची परतफेड करायची आहे.

सद्यस्थितीत किती अणुबॉम्ब पाकिस्तानकडे आहेत?

बुलेटिन ऑफ द अॅटोमिक सायंटिस्टच्या अहवालानुसार, पाकिस्तानकडे आता 165 अणुबॉम्बचा साठा आहे. अशा स्थितीत पाकिस्तानकडे 40 बॉम्बमधून सहज वाचू शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.