भारतीय लष्करामध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. पाकिस्तानच्या सीमेवर पाहणी करणाऱ्या लढाऊ विमानावरही महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता चीनच्या दिशेने असलेल्या सियाचीन या जगातील सर्वात उंच सीमेवरही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. कॅप्टन शिवा चौहान असे त्या पहिल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
सियाचीन बॅटल स्कूलमध्ये कॅप्टन शिवा चौहान यांना कठोर प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामध्ये बर्फाची भिंत चढणे, हिमस्खलन आणि हिमस्खलन बचाव कवायतींचा समावेश होता. दरम्यान, कॅप्टन शिवा चौहान एका कठीण चढाईनंतर यावर्षी 2 जानेवारीला सियाचीन ग्लेशियरमध्ये सामील झाल्या होत्या. कॅप्टन शिवा चौहान यांच्या नेतृत्वाखालील सैपर्सच्या टीमला अनेक अभियांत्रिकी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पोस्टवर तैनात केले जाईल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 जानेवारी रोजी शिवा चौहान यांच्या पोस्टिंगचे कौतुक केले होते. लष्करानेही एक निवेदन जारी करून म्हटले की, विविध आव्हानांना न जुमानता कॅप्टन शिवा चौहान यांनी पूर्ण बांधिलकीने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आणि त्या सियाचीन ग्लेशियरमध्ये सामील होण्यासाठी तयार आहेत. कॅप्टन शिवा चौहान या राजस्थानच्या रहिवासी आहेत.
(हेही वाचा ना गांधी ना पवार संजय राऊत म्हणतात पंतप्रधान पदासाठी ठाकरेंचा चेहरा)
Join Our WhatsApp Community