‘अमर रहे… अमर रहे… जनरल अमर रहे’, ‘वंदे मातरम…’ ‘भारत माता की जय…’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, रावतजी आपका नाम रहेगा…’ अशा घोषणा सर्वसामान्यांनासह स्वत: जवानांनीही दिल्या. फुलांनी सजवलेल्या रथातून जनरल रावत यांची पार्थिव यात्रा काढण्यात आली. दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत देशाच्या या योद्ध्याला अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला, त्यावेळी हजारो डोळ्यांतून अश्रू तरळले…सैन्यदलातील एका पर्वाचा अस्त झाला.
17 तोफांची सलामी
जनरल रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चारात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्या-पित्यांना मुखाग्नी दिला. कृतिका आणि तारिणी यांनी रावत आणि मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते. सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक जमले होते. तसेच श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी आले होते. स्वत: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रावत यांच्या अंत्ययात्रेत सामिल झाले होते.
(हेही वाचा धैर्यशील, द्रष्ट्या, कुशल रणनीतीकाराच्या निधनाने नि:शब्द झालो! – प्रविण दीक्षित)
Join Our WhatsApp Community