Cheetahs Viral Video : चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं ! वन विभागाची धडक कारवाई

Cheetahs Viral Video : चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं ! वन विभागाची धडक कारवाई

228
Cheetahs Viral Video : चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं ! वन विभागाची धडक कारवाई
Cheetahs Viral Video : चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं ! वन विभागाची धडक कारवाई

मध्यप्रदेशमध्ये तहानलेल्या चित्त्यांना वन विभागाचा एक ड्रायव्हर पाणी पाजत (Cheetahs Viral Video) असल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांना य कृतीचे कौतुक देखील केले आहे, मात्र यामुळे हा ड्रायव्हर अडचणीत सापडला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ड्रायव्हरला नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. (Cheetahs Viral Video)

या व्हिडिओमध्ये चित्ते झाडाच्या सावलीत झोपलेले दिसत आहेत. त्यावेळी एका ग्रामस्थ हातात पाण्याचा कॅन घेऊन पुढे येतो आणि त्या चित्त्यांसाठी एका ताटात पाणी ओतू लागतो. यानंतर बसलले चित्ते उभे राहतात आणि त्या त्याच्याकडे चालत येतात. व्हिडीओमध्ये हे चित्ते ताटातील पाणी पिताना दिसत आहेत. तर तो व्यक्ती तिथेच उभा राहून व्हिडीओसाठी पोज देताना दिसत आहे. नंतर हा व्यक्ती वन विभागाचा चालक सत्येंद्रनारायन गुर्जर असल्याचे समोर आले. (Cheetahs Viral Video)

हेही वाचा-Donald Trump आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात हजारो अमेरिकन नागरिकांची रस्त्यावर उतरून निदर्शने !

हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावात काढण्यात आला आहे. अनेकांनी चित्त्यांना पाणी देणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. मात्र वन विभागाने याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चित्त्यांना पाणी पाजतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, कुनो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सत्यनारायण गुर्जर याला विभागाच्या चालक पदावरून काढून टाकण्यात आले आहे. (Cheetahs Viral Video)

हेही वाचा-Ram Navami : अयोध्येत रामजन्मोत्सव सुरू ; ४ मिनिटांसाठी श्रीरामाचा सूर्य टिळक, रामजन्मभुमी २ लाख दिव्यांनी उजळणार !

चित्त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागेल आणि ते नागरी वस्तीच्या जवळच राहू लागतील अशी भीती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्याने या घटनेसंबंधी प्रतिक्रिया देताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी घडलेली पाणी पाजण्याची कृती ही वाढत असलेली समजूत आणि वर्तनात होत असलेल्या बदलाचे प्रतीक आहे. कदाचित गावकऱ्यांना लक्षात आले आहे की, चित्ते हे मुळात धोका नसून ते या भागाच्या नैसर्गिक परिसंस्थेचा भाग आहेत, म्हणून यावेळी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा निर्णय घेतला. पण तरीही, त्यांना इतक्या जवळ जाऊ देण्याची आणि त्यांच्याबरोबर असे कोणतेही नाते तयार होऊ देण्याची आमची इच्छा नाही.” (Cheetahs Viral Video)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.