कोरोनामुळे नक्षलवादी चळवळीला भगदाड! आता नक्षली नेता हरिभूषणचा मृत्यू!

या कोरोनाच्या विळख्यात अनेक नक्षली नेते सापडले आहेत. कमांडर सोनू, जयमन, नंदू, देवा हे सर्वजण कोरोनाने बाधित असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक बनली आहे.

165

घनदाट जंगलात राहून प्रस्तावित व्यवस्थेच्या विरोधात अर्थात देशाच्या विरोधात सशस्त्र बंड पुकरणाऱ्या राष्ट्रद्रोही नक्षलवादी चळवळीला आता कोरोनाने भगदाड पाडायला सुरुवात केली आहे. अती घनदाट जंगलात लपून बसलेल्या एक एका नक्षलीला कोरोना आता गाठत आहे. पहिल्या लाटेत डझनभर नक्षली नेत्यांचा कोरोनाने खात्मा केला, आता दुसऱ्या लाटेतही कोरोनाने नक्षलींचे जगणे मुश्कील केले आहे. नक्षलींच्या तेलंगणा राज्य समितीचा सचिव हरिभूषण याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर ४० लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.

दक्षिणी बस्तर भागातील नक्षली कारवायांचे नेतृत्व करायचा!

दांतेवाडातील पोलिस अधीक्षक डॉ. अभिषेक पल्लव यांनी याला अधिकृत दुजोरा दिला आहे. दक्षिणी बस्तर या भागात जेवढ्या नक्षली कारवाया झाल्या, त्याचे नेतृत्व हरिभूषण याने केल्याचे डॉ. पल्लव म्हणाले. तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर अनेकदा पोलिस आणि नक्षली यांच्यात झालेल्या चकमकीत हरिभूषण वाचला होता, अखेर कोरोनाने त्याचा जीव गेला. हरिभूषण उर्फ यापा नारायण हा तेलंगणा मेहबूबा बाद जिल्ह्यातील मरिगुडा गावात राहणारा होता. १९९५ मध्ये तो पीपल्स वॉर गुरिल्लामध्ये सहभागी झाला. तेव्हापासून तो नक्षली चळवळीत सक्रिय आहे. मागील काही दिवसांपासून हरीभूषण हा कोरोनाने बेजार झाला होता, अखेर २१ जून रोजी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.

(हेही वाचा : धक्कादायक! माओवाद्यांचा ७०० शाळकरी मुलांसाठी ट्रेनिंग कॅम्प!)

नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन!   

या कोरोनाच्या विळख्यात अनेक नक्षली नेते सापडले आहेत. बटालियन नंबर २ चा कमांडर सोनू, याच बटालियन चे सदस्य जयमन, नंदू, देवा हे सर्वजण कोरोनाने बाधित असून त्याचीही प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांच्यावरही लाखो रुपयांची बक्षिसे लावण्यात आली आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. पल्लव यांनी नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे. त्यांना सरकारतर्फे मदत केली जाईल, त्यांना सरकारी योजना दिल्या जातील, असेही डॉ. पल्लव म्हणाले.

पहिल्या लाटेत ५०हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण!

दरम्यान लॉकडाऊनमुळे नक्षली भगात नागरीवस्त्यांमधून होणारा अन्नधान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे आता तिथे नक्षलींची उपासमार सुरू झाली आहे. एका बाजूला उपासमार आणि दुसरीकडे कोरोना अशा कात्रीत नक्षलवादी सापडले आहेत. जंगलात कोरोनावर उपचार करण्याची सुविधा नाही. रेमडेसिवीर सारख्या औषधांचे वितरण केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे ती औषधेही जंगलात पोहचत नाही, उपचारासाठी नागरी वस्त्यांमध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास पोलिस अटक करतात. या भीतीने नक्षलवादी कोरोनाने आता तडफडून उपचारावीना मरू लागले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कोरोनाचा झालेला फैलाव! 

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही छत्तीसगडमधील नक्षल दलम भागात ५० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यात डझनभर नक्षलींचा मृत्यू झाला. ज्यामध्ये दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी मेंबर सुजाता हिचाही समावेश आहे. तिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. डिसेंबर २०१९ मध्ये रामण्णा याचा मृत्यू झाल्यानंतर सुजाता हिला अघोषित छत्तीसगडमधील माओवाद्यांची प्रमुख म्हणून ओळखली जाऊ लागली होती.

(हेही वाचा : नक्षल चळवळीसाठी आता मराठा समाज लक्ष्य!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.