पुण्यात स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली विशेष वाहने लष्करात दाखल

127

पुण्यातील बॉम्बे इंजिनीअर ग्रुप (बीईजी ) येथे 12 एप्रिल 2022 रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये लष्करप्रमुखांनी स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या, क्यूआरएफव्ही अर्थात मध्यम क्षमतेची त्वरित प्रतिसाद लढाऊ वाहने, आयपीएमव्ही अर्थात लष्कर संरक्षित वाहतूक वाहने, टीएएसएल अर्थात टाटा अडव्हांस सिस्टीम लिमिटेड या कंपनीद्वारे निर्मित अत्यंत दीर्घ पल्ल्याची निरीक्षण यंत्रणा तसेच भारत फोर्ज या कंपनीद्वारे निर्मित मोनोकॉक हल मल्टीरोल माईन संरक्षित सशस्त्र वाहन या विशेष वाहनांची पहिली तुकडी लष्कराच्या सेवेत दाखल करून घेतली.

‘आत्मनिर्भर भारता’च्या उपक्रमाला बळकटी

लष्करप्रमुख एम. एम.नरवणे, लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्यासह दोन दिवसांच्या पुणे भेटीवर आले आहेत. यावेळी भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारता’च्या उपक्रमाला बळकटी देण्याप्रती टाटा आणि भारत फोर्ज या कंपन्यांनी दर्शविलेल्या वचनबद्धतेबद्दल तसेच गेल्या अनेक दशकांमध्ये भारतीय लष्कराच्या मदतीसाठी सतत केलेल्या कार्याबद्दल लष्कर प्रमुखांनी त्यांची प्रशंसा केली.

(हेही वाचा – मनसेचा राऊतांना इशारा! “संपादक जेलमध्ये जाणार….” )

परिचालनविषयक क्षमता वाढणार

टीएएसएल आणि भारत फोर्ज या कंपन्यांनी स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या या यंत्रणांचा भारतीय लष्करात समावेश झाल्यामुळे लष्कराच्या भावी कारवायांमध्ये परिचालनविषयक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. या कार्यक्रमाला लष्कराच्या सेवेत कार्यरत असलेले तसेच सेवेतून निवृत्त झालेले अनेक मान्यवर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.