China : दुय्यम लेखण्यापेक्षा सहकार्य करणे हे दोन्ही देशांसाठी आवश्यक ! चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे विधान

54
China : दुय्यम लेखण्यापेक्षा सहकार्य करणे हे दोन्ही देशांसाठी आवश्यक ! चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे विधान
China : दुय्यम लेखण्यापेक्षा सहकार्य करणे हे दोन्ही देशांसाठी आवश्यक ! चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे विधान

पूर्व लडाखमधील (Eastern Ladakh) तणाव निवळल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध सकारात्मक होत असल्याचे चीनचे (China) परराष्ट्रमंत्री वँग यी (Wang Yi) यांनी शुक्रवारी (7 मार्च) वार्षिक पत्रकार परिषदेत सांगितले. हत्ती’ आणि ‘ड्रॅगन’ यांच्यातील बॅले (नृत्य) आणि दोन्ही देशांनी एकमेकांच्या यशामध्ये योगदान देणे हाच दोन्ही देशांतील संबंध पुढे नेण्यामध्ये एकमेव पर्याय आहे. असे उद्गार चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी काढले. (China)

हेही वाचा-Bangladeshi infiltrators : राष्ट्रगीत बोलायला सांगितले आणि ओळख पटली बांग्लादेशी असल्याची !

“सीमावाद किंवा कुठलेही विशिष्ट मतभेद दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यातील कझान येथील भेटीने द्विस्तरावरील संबंधांमध्ये अधिक प्रगती करण्यामध्ये सामरिक दिशा दिली. दोन्ही देशांनी त्यानंतर समान मुद्द्यांवर काम करून सर्व स्तरावर सहकार्य करून संबंध दृढ केले. एकमेकांना दुय्यम लेखण्यापेक्षा सहकार्य करणे हे दोन्ही देशांसाठी आवश्यक आहे. हाच एक मार्ग दोन्ही देशांचे मूलभूत हितसंबंध जपू शकतो. ” असं ते म्हणाले. (China)

हेही वाचा-ICSI मध्ये कर्मचार्‍यांना किती पगार दिला जातो?

‘अमेरिकेने अचानक बदललेल्या करधोरणावर चीन प्रत्युत्तर देणे सुरू ठेवेल,’ असे सांगून एखाद्या चांगल्याशी सैतानाबरोबर गाठ पडली असल्याची उपमा त्यांनी दिली. वँग म्हणाले, ‘चीनवर दबाव टाकणे आणि चांगले संबंधही ठेवणे एकाच वेळी शक्य नाही. कुठल्याही देशाने तशी कल्पना करू नये. असा दुटप्पीपणा द्विस्तरावरील संबंधांसाठी आणि परस्परविश्वासासाठी चांगला नाही.’ (China)

हेही वाचा-Protein In One Egg : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे! अहो पण, एका अंड्यामध्ये किती ग्रॅम प्रोटिन्स असतात?

आंतरराष्ट्रीय सहकार्याला अव्हेरून केवळ अमेरिकी हितांचा विचार ट्रम्प प्रशासन करीत असल्याचा संदर्भ देऊन वँग म्हणाले, ‘प्रत्येक देशाने अशीच भूमिका घेतली, तर जगात जंगलराज तयार होईल. त्यात लहान आणि दुर्बल देश प्रथम खाक होतील. आंतरराष्ट्रीय संतुलनाला मोठा धक्का बसेल.’ (China)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.