चीनने तैवानच्या सीमेजवळ २ तासांत डागली ११ क्षेपणास्त्रे

अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळी संतप्त झालेल्या चीनने तैवानला चिथावणी दिली आहे. चीनने तैवानच्या ईशान्य आणि नैऋत्य भागात अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. चीनकडून तैवानच्या सागरी हद्दीमध्ये ही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची माहिती तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. चीनने डागलेले दोन क्षेपणास्त्र डीएफ- १५ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बेटांवरून सोडल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

( हेही वाचा : पुणेकरांची पसंती इलेक्ट्रिक गाड्यांना; चार महिन्यांत ७१०० गाड्यांची विक्री)

२ तासांत ११ क्षेपणास्त्र 

चीनने सुमारे दोन तासांमध्ये ११ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तैवानच्या सागरी हद्दीत डागली आहेत. चीनने जाणूनबुजून क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याबद्दल तैवानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने चीन सरकारचा तीव्र निषेध केला. चीनच्या या कृतीमुळे तैवानची सुरक्षा धोक्याच आली आसून प्रादेशिक तणाव वाढला आहे, याचा परिणाम वाहतूक आणि व्यापारावर झाला असल्याची माहिती तैवानने दिली आहे.

लष्करी सरावाचा भाग म्हणून क्षेपणास्त्र हल्ले केले असे चीनने स्पष्ट केले आहे. चीनच्या युद्ध सरावामुळे तैवानने गुरूवारी आपल्या विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here