चीनकडून पाकला गोंजारणे सुरुच! भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकला अशी केली जात आहे मदत

चीनकडून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि इतर युद्ध साहित्य पुरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

75

भारताच्या नाठाळ शेजा-यांकडून कायमंच सीमेवर भारताविरुद्ध अनेक डाव रचले जात आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताने पाकिस्तानचा जगासमोर बुरखा फाडल्याने पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. त्यामुळे ढसाढसा रडणा-या पाकिस्तानला आता पुन्हा चीनने आपल्या मांडीवर बसवून गोंजारायला सुरुवात केली आहे. भारतविरोधी कारवायांची चीनची खुमखुमी अजून थंड झालेली नसून, चीनने आता पाकिस्तानला अत्याधुनिक ड्रोन पुरवल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक क्षमतेच्या ड्रोनचा पुरवठा

चीनकडून पाकला पुरवण्यात येणारे हे ड्रोन अधिक पेलोड क्षमतेचे सांगण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानकडे पाच ते सात किलो पेलोड क्षमतेचे ड्रोन उपलब्ध असून 14 ते 15 किलोमीटरचे अंतर कापण्याची त्यांची क्षमता आहे. हे ड्रोन 6 ते 8 तास काम करू शकतात. पण आता चीनने 15 ते 20 किलो पेलोड क्षमतेचे ड्रोन पाकला पुरवल्याचे समजत आहे. हे अत्याधुनिक क्षमतेचे ड्रोन 20 तासांसाठी कार्यरत राहत असून, 20 ते 25 किमी पर्यंतचे अंतर सहज पार करू शकतात. तसेच चीनकडून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि इतर युद्ध साहित्य पुरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः कोरोनानंतर चीनचा हा आहे नवा गेम…)

पाक सैन्याला चीनकडून प्रशिक्षण

पाकिस्तानचे सैन्य अधिकारी चीनच्या पीपल लिबरेशन आर्मी(पीएलए)च्या मुख्यालयात तैनात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे. पाकिस्तानी लष्कराचे कर्नल अधिकारी चीनच्या सैन्य आयोगाच्या संयुक्त कर्मचारी विभागात तैनात केले आहेत. हे पाकिस्तानचे लष्कर चीनच्या सशस्त्र दलात प्रशिक्षण घेत आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या 2016 च्या अहवालानुसार, पाकिस्तानने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर(सीपीईसी) आणि त्या कामाशी निगडित लोकांच्या सुरक्षेसाठी 9 हजार सैनिक आणि आपल्या निमलष्करी दलाच्या 6 हजार जवानांसह एक विशेष सुरक्षा विभाग स्थापन केला.

(हेही वाचाः चीन-पाकची भारताविरुद्ध ‘ही’ आहे नवी चाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.