केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चीनने लडाखमधील हजारो स्क्वेअर किलोमीटर जमीन ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या पाठोपाठ अनेक नेते करत असतात. मात्र लडाख (Ladakh) केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल निवृत्त ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा यांनी हा दावा परखड शब्दांत फेटाळून लावला.
1962 मध्ये काय झाले असेल ते जुने झाले. पण त्यानंतर चीन लडाखची (Ladakh) एक इंचही भूमी ताब्यात घेऊ शकलेला नाही. कारण आपले सर्व सैन्यबळ पूर्णपणे अलर्ट आहे. भारताच्या भूमीवर कब्जा करणाऱ्यांना जबरदस्त रक्तबंबाळ करणारा तडाखा मिळेल हे चिनी सरकार पक्के जाणून आहे. कोणा एका नेत्याच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, पण मी लडाखच्या भूमीतली वस्तुस्थिती पाहिली आहे. त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो की चीनने भारताच्या भूमीवर एक इंचही कब्जा केलेला नाही किंबहुना करू शकलेला नाही, असे परखड बोल ऐकवत मिश्रा यांनी राहुल गांधींना आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांना चपराक हाणली आहे.
(हेही वाचा Asia Cup 2023 IND vs PAK : भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानची गोलंदाजी फोडली; ३५६ धावा केल्या)
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चीनने लडाख (Ladakh) मधल्या भूमीवर घुसखोरी करून हजारो स्क्वेअर किलोमीटर भूमी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी संसदेतही करून पाहिला. पण त्यांना संसदेत सरकारने चोख प्रत्युत्तर दिले. आता देखील प्रत्यक्ष लडाखमध्ये काम केलेल्या आणि सध्या लडाखचे उपराज्यपाल असलेल्या बी.डी. मिश्रा यांनी परखड बोल सुनावत राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना चपराक हाणली आहे.
Join Our WhatsApp Community