चीनकडून PM Narendra Modi यांचे कौतुक ; नेमकं कारण काय ?

56
चीनकडून PM Narendra Modi यांचे कौतुक ; नेमकं कारण काय ?
चीनकडून PM Narendra Modi यांचे कौतुक ; नेमकं कारण काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लेक्स फ्रिडमन (Lex Friedman) पॉडकास्टमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना चीनबद्दल (China ) एक प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी दिलेले या प्रश्नाचे उत्तर शेजारील देश चीनला खूप आवडले आहे. चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने (Global Times) परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या विधानाचा हवाला देत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. (PM Narendra Modi)

हेही वाचा-Nagpur Violence : नागपूरमधील राड्यानंतर पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना या पॉडकास्टमध्ये चीनबद्दल महत्त्वाची विधाने केली आहेत. ते म्हणाले की, “हे खरे आहे की आमच्यामध्ये सीमावाद सुरू आहे. २०२० मध्ये सीमेवर घडलेल्या घटनांमुळे आमच्या देशांमध्ये खूप तणाव निर्माण झाला. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर आमच्यातील सीमांवर परिस्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. आता आम्ही २०२० त्या आधीची स्थिती परत आणण्यासाठी काम करत आहोत. हळूहळू पण निश्चितपणे विश्वास, उत्साह आणि ऊर्जा परत आणली जाईल. पण यासाठी काही वेळ लागेल, कारण पाच वर्ष अंतर पडले आहे.”

हेही वाचा-Digital Arrest : ८६ वर्षीय वृद्धेची २० कोटींची फसवणूक; दोन जणांना अटक

पंतप्रधान मोदींनी चीनबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ विंग यांनी एक विधान जारी केले असून, ते म्हणाले “आम्ही पंतप्रधान मोदींच्या विधानाचे कौतुक करतो. भारत-चीन संबंध स्थिर आणि मजबूत करण्यासाठी त्यांनी परस्पर सहकार्याला कामयमच पाठिंबा दिला आहे.” (PM Narendra Modi)

हेही वाचा-Best च्या आगारात ६५ मोबाईल टॉवर बसवण्यास परवानगी, पण भाडे किती?

एवढेच नाही तर माओ विंग यांनी भारताशी असलेल्या संबंधांबद्दल म्हटले आहे की, भारत आणि चीनने असे भागीदार बनले पाहिजे जे एकमेकांच्या यशात योगदान देतील. ते म्हणाले की, हत्ती आणि ड्रॅगनमधील बॅले नृत्य (सहकार्य) हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते माओ विंग यांनी पुढे सांगितले की, “राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनाला चीन भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत करू इच्छित आहे. ते म्हणाले की दोन्ही देश स्थिर आणि ठोस विकासाकडे एकत्र पुढे जाऊ शकतात.” (PM Narendra Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.