China Warns Pakistan: कर्ज लवकर फेडा नाहीतर..चीनने पाकिस्तानला धमकावले; नेमकी काय आहे ‘रणनिती’? वाचा सविस्तर…

पाकिस्तान फक्त आश्वासनांवर आश्वासने देत सुटलाय.

363
China Warns Pakistan: कर्ज लवकर फेडा नाहीतर..चीनने पाकिस्तानला धमकावले; नेमकी काय आहे 'रणनिती'? वाचा सविस्तर...
China Warns Pakistan: कर्ज लवकर फेडा नाहीतर..चीनने पाकिस्तानला धमकावले; नेमकी काय आहे 'रणनिती'? वाचा सविस्तर...

चीन आणि पाकिस्तान (China Warns Pakistan) यांच्यातील मैत्री फक्त देखाव्यापुरती आहे. हे पुन्हा एकदा जगासमोर उघड झाले आहे. नुकतीच पाकिस्तान आणि चीन या दोन देशांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत संरक्षण उपकरणांच्या देयकास विलंब होत असल्याबद्दल चीनने पाकिस्तानला कडक शब्दात धमकी दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीत पाकिस्तान सुरक्षेसाठी वापरत असलेल्या यंत्रणेबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या या बैठकीत चीनने पाकिस्तानला धमकावले आहे. तोफखान्यापासून ते क्षेपणास्त्र यंत्रणेपर्यंतच्या संरक्षण गरजांसाठी पाकिस्तान चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आले. यावेळी चीनने ‘संरक्षण उपकरणांची देयके जर वेळेवर दिली गेली नाहीत तर पाकिस्तानला संरक्षण उपकरणांचा पुरवठा थांबवणार असल्याची धमकी’ चीनकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये फक्त ६७ टक्के पाणीसाठा शिल्लक)

तज्ज्ञांच्या मतानुसार, पाकिस्तानवर चीनचे १.५ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. यावरून पाकिस्तानवर दबाव आणणे हा चीनच्या रणनीतीचा एक भाग आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या बैठकीत तोफखान्यापासून क्षेपणास्त्र यंत्रणेपर्यंतच्या संरक्षण गरजांसाठी पाकिस्तानला चीनवर अवलंबून राहाव्या लागण्याच्या मुद्द्याला अधोरेखित करण्यात आले. याशिवाय असेही म्हटले जात आहे की, जर कर्जाचा पेच दीर्घकाळ टिकला तर पाकिस्तानसाठी आणखी समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे केवळ प्रमुख संरक्षण प्रणालीच नाही, तर दोन्ही देशांमधील संबंधांवरही विपरित परिणाम होऊ शकतो.

संरक्षण यंत्रणांकरिता पाकिस्तान चीनवर अवलंबून
चीन बऱ्याच काळापासून पाकिस्तानची लष्करी क्षमता वाढवण्यासाठी मदत करत आहे. पाकिस्तानकडून भारतात अंमली पदार्थ पाठवण्याच्या अयशस्वी प्रयत्नात लष्कराने मेड-इन-चायना क्वाडकॉप्टर (एक प्रकारचे ड्रोन) ताब्यात घेतले. भारतीय नौदल प्रमुखांनी अलीकडेच पाकिस्तान आणि चीनमधील नौदल क्षमतेतील वाढत्या संबंधांवर प्रकाश टाकला.

चीनला त्याचे पैसे परत मिळत नाहीत
मेजर जनरल अशोक कुमार (सेवानिवृत्त) यांनी सांगितले की, ‘पाकिस्तान फक्त आश्वासनांवर आश्वासने देत सुटलाय मात्र चीनला त्याचे पैसे परत मिळत नाहीत. सुरक्षा आघाडीवर कोणताही लक्षणीय बदल झालेला दिसत नाही. संरक्षण उपकरणे किंवा सी. पी. ई. सी. मधील पत-आधारित पुरवठ्याच्या बाबतीत पाकिस्तानला दिलेला पाठिंबा मागे घेऊ शकत नाही याचीही चीनला जाणीव आहे.’

पाकिस्तानवर दबाव आणणारी ‘रणनिती’…
केवळ पायाभूत सुविधा किंवा दळणवळण प्रकल्पांपुरती मर्यादित नाही, तर त्यापलीकडे विमान, व्हीटी-4 रणगाडे, तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणाली यासारख्या महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. यावर तज्ज्ञांनी असे मत नोंदवले आहे की, पैसे न भरण्याचा मुद्दा खरा असला, तरी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी चीनद्वारे वापरली जाणारी ही केवळ एक “रणनिती” आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.