हिंद महासागरात भारत आणि चीनमधील संघर्ष वाढत आहे. भारतीय नौदलाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी चीन त्याची हेरगिरी जहाजे हिंद महासागरात पाठवत आहे. (Chinese Spy Ship In Shrilanka) गेल्या काही महिन्यांपासून चिनी नौदलाची जहाजे श्रीलंकेच्या बंदरांवर सतत तळ ठोकून आहेत. गेल्या महिन्यात भारताने याविषयी अनेक आक्षेप नोंदवूनही श्रीलंकेने चिनी नौदलाची युद्धनौका Hay Yang 24 Hai ला कोलंबो बंदरावर उतरण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर है यांग 24 हाओ 138 क्रू मेंबर्ससह श्रीलंकेतील कोलंबोला पोहोचले आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात चिनी नौदलाचे संशोधक जहाज शि यान 6 श्रीलंकेच्या कोलंबो आणि हंबनटोटा बंदरांवर तळ ठोकेल. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी संशोधक जहाज ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेच्या समुद्राच्या परिसरात फिरणार आहे.
(हेही वाचा – Bharat : ‘भारत माता कि जय’; देशाचे नाव बदलण्यास अमिताभ बच्चन यांचे अप्रत्यक्ष समर्थन )
गेल्या काही महिन्यांपासून चिनी नौदलाची जहाजे श्रीलंकेच्या बंदरांवर सतत तळ ठोकून आहेत. भारतीय सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन भारतीय नौदलाच्या युद्ध सरावावरही विशेष लक्ष देत आहे. भारतीय नौदल ऑस्ट्रेलियन, अमेरिकन आणि जपानी नौदलांसोबत सातत्याने संयुक्त लष्करी सराव करत आहे. त्यामुळे चीनचा तीळपापड होत आहे. (Chinese Spy Ship In Shrilanka)
भारताकडून बनवल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवरही चीन सतत लक्ष ठेवून आहे. भारतीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यासाठी चीनने उपग्रहाचा मागोवा घेणे, तसेच भारतीय क्षेपणास्त्रांची मारक क्षमता शोधणे या उद्देशाने गेल्या वर्षी युआन वांग-6 नावाचे क्षेपणास्त्र ट्रॅकर हिंदी महासागरात पाठवले होते. (Chinese Spy Ship In Shrilanka)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community