China चे सैन्य भारतीय सीमेवर अनिश्‍चित काळासाठी तैनात

216
रशिया-युक्रेन युद्ध, तसेच इस्रायल-हमास युद्ध, हे जरी चर्चेचे विषय असले, तरी दक्षिण चीन (China) समुद्रातील वाढता तणाव आणि चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ भारताच्या सीमेवर स्वतःची स्थिती सतत सशक्त करत असण्याकडेही दुर्लक्षून चालणार नाही. ‘यू.एस्. इंटेलिजन्स कम्युनिटी’च्या अहवालात याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये वार्षिक धोक्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यात चीन आणि भारत यांच्यातील सीमा तणावाला जगातील इतर सर्व संघर्ष, धमक्या आणि तणाव, यांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे. ‘सीमा तणावामुळेच उभय देशांमधील संबंध ताणलेले रहातील’, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
जून २०२० मधील गलवान संघर्ष सोडला, तर दोन्ही देशांच्या सीमेवर कोणतीही मोठी चकमक झालेली नाही. असे असले, तरी चीनने अनिश्‍चित काळासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एप्रिल २०२४ मध्ये ‘यू.एस्. आर्मी वॉर कॉलेज’च्या ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज इन्स्टिट्यूट’ने वर्ष २०२०-२१ मध्ये अक्साई चीनमधील (China) पर्वतीय सीमेवर असलेल्या चिनी सैन्याच्या हालचालींच्या सखोल तपासणीचा अहवाल प्रकाशित केला. अहवालाचे प्रमुख लेखक डेनिस ब्लास्को हे बीजिंग आणि हाँगकाँग यांच्यातील अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी म्हटले की, अक्साई चीन प्रदेशातून सैन्य मागे घेण्यासाठी चीन भारतीय सैन्य आणि सरकार यांच्याशी चर्चा करत असला, तरी तो अक्साई चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि डोकलामच्या सीमेवर त्याचे सैन्य अनिश्‍चित काळासाठी तैनात ठेवणार आहे.

चीन अमेरिकेसमवेत अंतराळात युद्ध करण्‍याच्‍या तयारीत 

अमेरिकेने दीर्घकाळ अंतराळात त्‍याचे वर्चस्‍व राखले होते, मात्र आता ते धोक्‍यात आले आहे. चीनने ज्‍या वेगाने अंतराळात त्‍याची क्षमता वाढवली आहे आणि सामरिक डावपेचांवर भर दिला आहे, त्‍यामुळे लवकरच तो अंतराळात अमेरिकेशी युद्ध करण्‍याच्‍या तयारीत आहे. अमेरिकी संस्‍था ‘रँड’ने तिच्‍या नवीन अहवालात म्‍हटले की, चीनच्‍या पीपल्‍स लिबरेशन आर्मीने गेल्‍या २ दशकांत मिळवलेल्‍या अवकाश-आधारित क्षमतेचे विश्‍लेषण केले आहे. चीनचे (China) राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग अमेरिकेकडे कमकुवत शक्‍ती म्‍हणून पहातात. यामुळे भविष्‍यात अंतराळातील स्‍पर्धेसाठी चीन आता आक्रमक सिद्धता करत आहे.
अहवालात म्‍हटले आहे की, चीन सैन्‍याच्‍या रणनीतीमध्‍ये प्रतिकारासह आक्रमकता समाविष्‍ट आहे, ज्‍याचा वापर विरोधकांना विनाशकारी अंतराळ युद्धाला सामोरे जाण्‍यास किंवा त्‍यास सामोरे जाण्‍यास भाग पाडण्‍यासाठी केला जातो. या अहवालात सुचवण्‍यात आले आहे की, चीन (China) अंतराळात त्‍याची सैनिकी सिद्धता प्रामुख्‍याने अमेरिकेला डोळ्‍यांसमोर ठेवून करत आहे. या प्रकरणी अमेरिकेने त्‍वरित निर्णय घेतला पाहिजे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.