Indian Air Force : चिनुक अन् सी-२९५ने वाढवली हवाई दलाची ताकद

अवजड वाहतुकीची अमेरिकन बोइंग कंपनीची हेलिकॉप्टर आहेत.

206
Indian Air Force : चिनुक अन् सी-२९५ने वाढवली हवाई दलाची ताकद
Indian Air Force : चिनुक अन् सी-२९५ने वाढवली हवाई दलाची ताकद

लढणारी विमाने व युद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणावर करण्यात येणारे हवाई हल्ले हे सर्व डोळ्यासमोर येते. मात्र डोंगराळ भागात रसद पोहचवण्यासाठी दुर्गम भागातील रस्ते कामासाठी आणि विमान व हेलिकॉप्टर चे होत असलेले सहकार्य  मानवी सेवेला बळ देणारे आहे. हवाई दलात चिनुक हेलिकॉप्टर दाखल करून घेण्यात आली.ही अवजड वाहतुकीची अमेरिकन बोइंग कंपनीची हेलिकॉप्टर आहेत. (Indian Air Force )

अनेक वर्षांनी भारताला अवजड वाहतुकीसाठी योग्य ठरणारी हेलिकॉप्टर उपलब्ध झाली. आज ईशान्य भारतात चीनने आगळीक केल्यास त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रस्ते, पुलांसह पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. त्यासाठी या प्रदेशांत अहोरात्र आवश्यक ती सामग्री पोहोचविण्याचे काम चिनुक करीत आहे. ‘चिनुक समाविष्ट होण्याआधी आपल्याकडे एमआय २६ हे रशियन हेलिकॉप्टर होते. त्यांनीही चांगली सेवा दिली होती. परंतु, एमआय २६च्या निवृत्तीनंतर मधल्या काळात अवजड वाहतुकीसाठी अन्य हेलिकॉप्टर नव्हते, ते आता चिनुकच्या रूपाने मिळाले आहे.

एअरबस कंपनीचे सी-२९५ हे मध्यम वाहतुकीचे विमानही हवाई दलासाठी भविष्यात एकमेवाद्वितीय ठरेल, असा विश्वास हवाई दलाला आहे. सध्या हे विमान केवळ अॅवरो या विमानाची जागा घेणार आहे. भारतीय हवाई दलात सध्या अॅवरोखेरीज एएन ३२ ही मध्यम वाहतुकीची विमाने आहेत. या विमानांचे आधुनिकीकरणही झाले आहे. मात्र हे विमान मूळ सोव्हिएत बनावटीचे असून त्याचा मुख्य कारखाना युक्रेनमध्ये आहे. या स्थितीत भविष्यात आणखी आधुनिकीकरण करताना सुट्या भागांचा प्रश्न निर्माण होईल. त्यावेळी पुढील आठ ते दहा वर्षांत एएन ३२ ताफ्यातून निवृत्तीचा निर्णय घेताना अन्य विमाने खरेदी करण्याची गरज भासणार नाही. सी-२९५ ही विमाने क्षमतेनुसार एएन ३२ ची जागाही घेऊ शकतील. तसेच सी-२९५ ची ५६ पैकी ४० विमाने भारतातच तयार होणार आहेत. (Indian Air Force)

(हेही वाचा : Indian Air Force Unveils New Flag : भारतीय हवाई दलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण; काय आहे खास…)

ही आहेत वैशिष्ठ्ये

क्षमता : ५५ सैनिक किंवा ११ हजार १४८ किलो सामग्री, १० हजार ८८६ किलो सामान बाहेरील बाजूने वाहून नेणे      उड्डाण क्षमता : २० हजार फूट उंचीपर्यंत ७४० किमी सलग
सर्वाधिक वेग : ताशी ३१५ किमी सी-२९५ विमान
क्षमता : ७३ सैनिक किंवा २३ हजार २०० किलो सामग्री
उड्डाण क्षमता : ३० हजार फूट उंचीवर ५ हजार किमी सलग
सर्वाधिक वेग : ताशी ४८२ किमी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.