पुन्हा होणार ‘२६/११’? गुप्तचर संघटनेच्या माजी अधिकाऱ्याने दिला धोक्याचा इशारा

मुंबई हल्ला हे स्थानिक जिहादाचे स्वरूप होते. त्या हल्ल्यातील कटामध्ये चित्रपटसृष्टीतील काही नालायक आणि कुख्यात गुंड दाऊदच्या साथीदाऱ्यांचाही सहभाग होता, असे कर्नल आर.एस.एन. सिंग म्हणाले.

लष्कर-ए तोयबा, जैश-ए महंमद या संघटनांतील दहशतवाद्यांनी समुद्रीमार्गे जिहादी आक्रमणाचे प्रशिक्षण घेतले आहे. जागतिक पातळीवर ज्या जिहादी संघटना कार्यरत आहेत, त्यामध्ये समुद्री जिहादला विशेष महत्व आहे आणि प्रतिष्ठाही आहे. विशेष म्हणजे याप्रकारचे जिहादी प्रशिक्षण केवळ पाकिस्तानात दिले जाते, त्या पाकिस्तानकडून २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणार नाही, अशा भ्रमात राहू नका, असा इशारा संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि  ‘रॉ’ या भारताच्या गुप्तचर संघटनेचे माजी अधिकारी कर्नल आर.एस.एन. सिंग यांनी दिला.

कर्नल सिंग यांनी ‘नो द अँटी नॅशनल’ हे पुस्तक लिहिले आहे, त्याचे हिंदी भाषेतही अनुवाद केले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘२६/११’ चा हल्ला कसा झाला? त्यामागील कोणते अदृश्य हात होते? याचाही खुलासा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वतीने कर्नल सिंग यांची मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या सल्लागार संपादिका मंजिरी मराठे यांनी ही मुलाखत घेतली. त्यावेळी कर्नल सिंग यांनी ‘२६/११’चा जिहादी हल्ला आणि जागतिक पातळीवरील जिहादी संघटना यांविषयी विस्तृत विवेचन केले.

(हेही वाचा : अमेरिकेच्या ‘त्या’ विमानाने अफगाण नागरिकांना चिरडले!)

तालिबानी, लष्कर, जैश-ए महमंद यांना सहारनपूरमधून मिळते शिकवण 

अफगाणिस्तानाचा सध्या तालिबान्यांनी कब्जा केला आहे. त्यांना मुंबई हल्ला करणाऱ्या लष्कर – ए तोयबा, जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनाही मिळालेल्या आहेत. मुंबई हल्ला हे स्थानिक जिहादचे स्वरूप होते. त्या हल्ल्यातील कटामध्ये चित्रपटसृष्टीतील काही नालायक आणि कुख्यात गुंड दाऊदच्या साथीदाऱ्यांचाही सहभाग होता. तालिबानला कुणाचे समर्थन आहे, कुणाकडून त्यांना शस्त्र पुरवठा होतो, यावर चर्चा सुरु आहे, पण या दहशतवाद्यांचे वैचारिक प्रशिक्षण कुठे होते? हे एकदा तपासा. देवबंद विचाराशी तालिबान्यांचा संबंध आहे. आज अफगाणिस्तानात जो तालिबान्यांनी हैदोस घातला आहे. त्या जिहादी लाटेत भारत बुडून जाईल, अशा विचाराने अनेकांच्या मनात लाडू फुटत आहेत. त्याला कारणही आहे. या तालिबान्यांशी जैश-ए महमंद, लष्कर-ए तोयबा यांचा संबंध आहे आणि या संघटनाही देवबंद विचारांच्याच आहेत. या सर्व जिहाद्यांना शस्त्रास्त्र पुरवठा कुठूनही होत असला तरी देवबंद विचार मात्र उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून दिले जातात, हे लक्षात घ्या, असेही कर्नल सिंग म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here