चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलासाठी 1 मार्च 2019 हा दिवस आनंदाचा होता. त्यादिवशी पाकड्यांच्या कचाट्यातून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाली होती आणि ते मातृभूमीत परतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचूक रणनीती आखून पाकिस्तान्यांना विंग कमांडर अभिनंदन यांना पुन्हा भारतात पाठवावे लागले होते.
काय घडलेले 27 फेब्रुवारी 2019 रोजी?
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दल सतर्क होते. हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर पाकिस्तानी विमानांवर नजर ठेवण्याची जबाबदारी होती. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी लढाऊ विमाने काश्मीरमध्ये घुसखोरी करतील, अशी माहिती समोर आली होती. ही गोष्ट खरी ठरली आणि 27 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी दहा वाजता पाकिस्तानची दहा F-16 विमाने भारतीय हद्दीत घुसली. यानंतर भारतीय हवाई दलाने पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देत F-16 निशाण्यावर घेतले. भारताचे प्रत्युत्तर पाहून पाकिस्तानी हवाई दलाची नऊ F-16 विमाने परतली. एक F-16 हे विमान भारतीय हद्दीत खूप खालून उडत होते. त्याने भारताचे तेल डेपो, लष्करी दारूगोळ्याचा एक पॉइंट आणि लष्करी ब्रिगेडचे मुख्यालय यांना लक्ष्य केले. भारताचे सुखोई SU-30 आणि मिग-21 पाकिस्तानी जेट F-16 ला भिडले. याला हवाई दलाच्या भाषेत डॉग फाईट म्हणतात. दोन भारतीय विमानांनी F-16 ला आपल्या जाळ्यात अडकवले. मिग-21 पुढे उड्डाण करत होते. मध्ये F-16 होते आणि सुखोई त्याचा पाठलाग करत होते. गोळीबार सुरू होता. त्यानंतर F-16 ने दोघांमधून निसटण्याचा प्रयत्न केला. याला विंग ओव्हर म्हटले जाते.
(हेही वाचा Maharashtra Political Crisis: शिंदे गटाच्या वकिलांचा ‘तो’ दावा सरन्यायाधीशांनी फेटाळला)
तर भारत पुन्हा करणार होता आक्रमण
आता सुखोईने F-16 चा पाठलाग थांबवला आणि ऑईल फील्ड वाचवण्यासाठी त्यावरून उड्डाण करायला सुरुवात केली. मिग-21 मध्ये बसून विंग कमांडर अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग सुरूच ठेवला. F-16 भारतीय सीमेच्या बाहेर गेले होते. त्यानंतर मिग-21 ने F-16 वर R-73 क्षेपणास्त्र डागले. 10:08 वाजता विंग कमांडर अभिनंदन यांचे R-73 क्षेपणास्त्र थेट F-16 जेटला धडकले. यावेळी अभिनंदन अतिशय धोकादायक कलाबाजी करत होते, ज्याला हाय-जी-बॅरल रोल म्हणतात. यादरम्यान तेही पाकिस्तानच्या भागात आले होते आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे लक्ष्य बनले होते. मिग-21 क्रॅश होत असताना अभिनंदन पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडले. पॅराशूटने ते उतरले तेव्हा ते पाकव्याप्त काश्मीरमधील होरान गावात होते. येथे स्थानिक लोकांनी त्यांना प्रथम हा भारत असल्याचे सांगितले आणि नंतर फसवणूकीने पकडले. अभिनंदन यांना बेदम मारहाणीचा आणि नदीत घेरल्याचा व्हिडिओही समोर आला होता. यानंतर पाकिस्तानच्या संसदेत विंग कमांडर अभिनंदन यांना सोडले नाही, तर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल, असा इशारा देण्यात आला. त्यावेळी स्वतः पंतप्रधान इम्रान खान यांना घाम फुटला होता.
Join Our WhatsApp Community