भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावर आगामी 11 मार्च रोजी पंधरावी कमांडर स्तरीय सैन्य चर्चा होणार आहे. 11 मार्चला भारतीय हद्दीतील चुशूल येथे ही चर्चा होणार आहे.
यापूर्वी जानेवारी महिन्यात सीमा प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये सैन्य चर्चा झाली होती. चौदाव्या फेरीतील ही चर्चा अनिर्णित ठरली होती. परंतु, त्याच वेळी भविष्यातील चर्चेचा मार्ग मोकळा होता. दोन्ही देशांनी असे ठरवले होते की, सीमेवर शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यावेळी झालेल्या चर्चेत हॉट स्प्रिंग एरिया, नॉर्थ आणि साऊथ पंगांग सा, गोवन आणि गोगरा हॉट स्प्रिंग एरियावर चर्चा झाली होती. यादरम्यान, दोन्ही बाजूंनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देश आपापल्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार विवादित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नरत राहतील.
( हेही वाचा : माहुल पंपिग स्टेशनच्या कामाला लवकरच होणार सुरुवात: प्रस्ताव मंजूर )
शांतता प्रस्थापित करणे
या निवेदनात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करणे हा चर्चेचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चर्चेची 14 वी फेरी चीनमधील मोल्डो येथे झाली होती. तब्बल 12 तासांहून अधिक जास्त काळ चालू असलेल्या चर्चेत भारताचे प्रतिनिधीत्व लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांनी केले होते. तसेच चौदाव्या फेरीतील या चर्चेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. मात्र, पंधराव्या फेरीत सर्व वाद मिटतील की नाही हे निश्चित नाही. याचे कारण चीन आपल्या ठाम भूमिकेवर ठाम असल्याने वाद कायम आहे.
Join Our WhatsApp Community