युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची देशातील राज्यांना चिंता!

111

रशिया-युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असून जगभरात तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत, त्यामुळे देशातील विविध राज्यांनी आपल्या नागरिकांविषयी चिंता व्यक्त केली आहे.

सतत संपर्कात रहा

युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांची तिथे काय व्यवस्था आहे, ते पाहण्याच्या तसेच या नागरिकांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला प्राधान्याने केंद्राशी संपर्कात रहावे असे सांगितले आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

(हेही वाचा ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी मलिकांसाठी मोडला ‘हा’ नियम!)

मुख्यमंत्र्यांचे विशेष आवाहन

युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीवर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी चिंता व्यक्त करीत केंद्र सरकारला विशेष आवाहन केले. युक्रेनमध्ये अनेक केरळचे विद्यार्थी असून याबाबत केंद्र सरकारला सूचित करण्यात आले आहे. भारतीयांच्या रक्षणाचे अभियान वेगवान आणि तीव्र करण्याचे आवाहन पिनारायी विजयन यांनी विधान सभेत केले.

विशेष अभियान सुरु

यूक्रेनची राजधानी कीवमध्ये, भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना शांती कायम ठेवण्याचे आवाहन करत सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. दूतावासाने सांगितले आहे की, युक्रेनची स्थिती अत्यंत नाजूक असून भारताच्या दूतावासाने आपातकालीन सेवा कक्ष स्थापित केला आहे. भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर संपूर्ण स्थितीची माहिती घेत आहेत. दिल्लीत युक्रेनच्या भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी 24×7 कार्यरत अशी संपर्क प्रणाली सुरु करण्यात आली असून रशिया-युक्रेन संघर्षात भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना सहकार्य आणि मदत करण्यासाठी नियंत्रण कक्षात विशेष अभियान सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.