लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद येत्या 18 ते 22 एप्रिल दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. ही लष्करातील अधिकाऱ्यांची परिषद, हा सर्वोच्च स्तरावरील द्वैवार्षिक कार्यक्रम आहे जो दर सहा महिन्यांनी एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये आयोजित केला जातो. ही परिषद वैचारिक पातळीवरील विचारमंथनासाठी एक संस्थात्मक व्यासपीठ आहे, ज्यात भारतीय लष्कराकरता महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येतात.
रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रभावाचे मूल्यांकन
या परिषदेदरम्यान, भारतीय लष्कराचे वरिष्ठ नेते सीमावर्ती भागातील सक्रिय परिचालन परिस्थितीचा आढावा घेतील, संघर्षाच्या संपूर्ण यंत्रणेमधील धोक्यांचे मूल्यांकन करतील आणि क्षमता विकास आणि कारवाईसाठी सज्ज रहाण्याच्या योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करत, त्रुटी दूर करण्यासाठी विश्लेषण करतील. सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित पैलूंवर चर्चा, स्वदेशीकरणाद्वारे आधुनिकीकरण, वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रभावाचे मूल्यांकन या विषयांवरही या परिषदेत चर्चा होणार आहे.
(हेही वाचा राऊतांना कामधंदा नाही, त्यांच्यावर काय बोलायचे? फडणवीसांनी केले दुर्लक्ष)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संवाद साधणार
प्रादेशिक कमांडकडून मांडलेल्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा केली जाईल, तसेच भारतीय सैन्याच्या कामगिरीत सुधारणा करणे, आर्थिक व्यवस्थापन, ई-वाहनांचा समावेश आणि डिजिटायझेशन यासंबंधीच्या प्रस्तावांवर चर्चा केली जाईल. परिषदेचा एक भाग म्हणून, आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES) आणि आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंड (AGIF) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या बैठकाही आयोजित केल्या जातील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे 21 एप्रिल 2022 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधतील आणि परिषदेला संबोधित करतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय सैन्यातील वरिष्ठ नेतृत्व आणि लष्करी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सैन्य व्यवहार आणि संरक्षण विभाग (MoD) यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी ही परिषद हा एक औपचारिक मंच देखील आहे.
Join Our WhatsApp Community