चीन – पाकला धडा शिकवणारी बिपीन रावत यांची ‘ही’ आहे शौर्यगाथा!

92

लष्कराचे हेलिकॉप्टर बुधवारी ८ डिसेंबरला तामिळनाडू येथील कोन्नूर या ठिकाणी कोसळले. या दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला. बिपीन रावत यांना मागील तीस वर्षांचा सैन्यदलाचा प्रदीर्घ अनुभव आहे. बिपिन रावत 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

डोकलाममध्ये चिन्यांना शिकवला धडा

आजवर भारत-चीन सीमेवर चीनी सैन्यांची दादागिरी असायची. त्याठिकाणी चीनी सैन्य भारतीय सीमेत घुसखोरी करून भारतीय सैन्यावर धाकदपटशहा करत असायचे. सीमा भागात अवैध बांधकाम करून त्या जागेचा कब्जा करण्याचा प्रकार चीनी सैन्याकडून वारंवार होत होता. २०१४ मध्ये सत्ताबदल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. त्यांनी सीमा भागात कडक धोरण स्वीकारले. त्यांना अपेक्षित काम जनरल बिपीन रावत यांनी केले. लष्करप्रमुख पदावर असताना रावत यांनी सीमावर्ती भागातील सैन्यामध्ये उत्साह भरलाच, तसेच चीनच्या सीमेजवळील भारतीय सैन्यांना कधी नव्हे इतकी मोकळीक दिली, ज्याचा परिणाम इतिहास घडवून गेला. डोकलाममध्ये नेहमीप्रमाणे सीमेवर घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांचे भारतीय सैन्याने मुडदे पाडले. १९६२ नंतर पहिल्यांदा भारतीय सैनिकांनी प्रतिकार केला आणि त्याठिकाणी चीन्यांचे रक्त सांडले. तेव्हाच चीनला समजले, भारत १९६२ चा राहिला नाही. त्यानंतर चीनच्या सीमेजवळ लढावू विमानतळ उभारणे असो की जलद वाहतुकीसाठी मोठाले हायवे बांधणी असो किंवा सीमा भागातील सैन्याना अत्याधुनिक शस्त्र देणे असो, बिपीन रावत यांचे विशेष योगदान होते.  सीमाभागात सैन्यांच्या नियमित बैठका, संवाद आणि युद्ध सराव याद्वारे रावत यांनी सैन्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.

पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या

डोकलामच्या  आधी जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. पाकिस्तानने भारतात काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ला घडवून भारतीय सैन्याचे हत्याकांड घडवून आणले. त्यावेळीही भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य दिले. त्याचे परिणाम म्हणून लागलीच भारतीय सैन्याने रात्रीच्या अंधारात पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक करून पाकड्यांचे दहशतवादी तळे उद्धवस्त केली. सकाळी पाकड्यांना दहशतवाद्यांची प्रेते कुठे लपवायचे कुठे नको, अशी परिस्थिती झाली होती. जगाला ओरडून सांगावे तर दहशतवादी तळे पाकिस्तानात होती, हे कळेल. नाही सांगावे तर भारतासमोर मानहानी स्वीकारावी लागेल, अशी पाकिस्तानची दयनीय स्थिती झाली होती. या हल्ल्यात बिपीन रावत यांची महत्वाची भूमिका होती. तेव्हापासून पाकने कधीच सैन्यावर आत्मघातकी हल्ला करण्याची हिंमत केली नाही. रावत यांनी पाकड्यांना शिकवलेला हा महत्वाचा धडा होता.

( हेही वाचा : लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे ‘ही’ असू शकतात कारणे! काय म्हणतात संरक्षण तज्ज्ञ? )

सैन्यामध्ये आत्मविश्वास वाढवला

लष्कराला घडवण्यातही रावत यांचा मोलाचा वाटा आहे. प्रशासकीय त्रुटी दूर करणे, सैन्याची लढाऊ क्षमता वाढवणे यासाठी सैन्याची पुनर्रचना करण्यात रावत यांनी मुलभूत योजना आखल्या. भारतीय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अधिकारी बनलेले बिपीन रावत हे पहिले व्यक्ती आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयासाठी काम करतात आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतात. अशी महत्वपूर्ण कामगिरी बिपीन रावत यांनी बजावली आहे. त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्याकडील अनुभवाचा वापर करत सैन्य अधिकार्यांचे चातुर्य वाढवले. सैन्यात भेदभाव कमी केला. खालपासून वरपर्यंत सर्वांचे मनोबल वाढवले. त्यांचे सतत बौध्दीक घेतल्याने सैन्याचे आत्मबळ वाढले. सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रे सुसज्ज करण्यासाठी राफेल लढावू विमान खरेदी, रणगाडे खरेदीसह स्वदेशी शस्त्र निर्मितीलाही गती दिली. त्यामुळेच जनरल बिपीन रावत यांना उत्कृष्ट लष्कराचा सर्वोच्च शौर्यपदक प्रदान करून गौरविण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.