
छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील एका मिशनरी नर्सिंग कॉलेजमध्ये ख्रिश्चन धर्मांतराणाचा (Christian Conversion) प्रकार समोर आला आहे. येथे विद्यार्थिनींवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात आहे. याला विरोध केल्यास परीक्षा देऊ न देण्याव्यतिरिक्त, इतर मार्गांनीही त्यांचा छळ केला जात आहे. (Christian Conversion)
हेही वाचा-आता हमाल मिळणार ऑनलाइन ; Western Railway ने सुरू केली ‘पोर्टर ऑन कॉल’प्रणाली
ऑपइंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जशपूरच्या कुंकुरी पोलीस स्टेशन परिसरातील होली क्रॉस नर्सिंग कॉलेजमध्ये घडली. येथे नर्सिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीने प्रिन्सिपल विन्सी जोसेफवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनी म्हणते की, जीएनएमच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतल्यानंतर तीन महिन्यांनी, मुख्याध्यापकांनी तिला बोलावले आणि हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची ऑफर दिली. (Christian Conversion)
जेव्हा विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले तेव्हा प्रिन्सिपल विन्सी तिला वारंवार इस्लाम धर्म स्वीकारण्यास आणि नन बनण्यास सांगत होत्या. जेव्हा विद्यार्थिनीने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा कॉलेज व्यवस्थापनाने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनीने सांगितले की, तिला वर्गातून बाहेर काढण्यात आले. कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास मनाई होती. त्यानंतर १ एप्रिल २०२४ रोजी तिला वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. अभ्यास करण्यापासून रोखण्याचा आणि वार्षिक परीक्षेला बसू न देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने या संपूर्ण प्रकरणावर जिल्हाधिकारी आणि एसपींकडे लेखी तक्रार दाखल केली आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. (Christian Conversion)
"शिक्षा के आड़ में धर्मांतरण बर्दाश्त नही किया जाएगा "
होलीक्रॉस नर्सिंग कॉलेज (कुनकुरी) जिला जशपुर में बहन छात्रा कु. अमिशा बाई को जबरन प्रताड़ित कर धर्मांतरण करने वालो को बिलकुल बक्शा न जाए, संबंधित प्राचार्या के खिलाफ कानूनी कारवाई हो और उस संस्था की मान्यता रद्द करके तत्काल…
— Prabal Pratap Singh Judev (@prabaljudevBJP) April 3, 2025
धर्मांतर सहन केले जाणार नाही
छत्तीसगड भाजप नेते आणि अखिल भारतीय घर वापसी संघटनेचे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही. होली क्रॉस नर्सिंग कॉलेज (कुंकुरी) जिल्हा जशपूर येथे विद्यार्थिनीचा जबरदस्तीने छळ आणि धर्मांतर करणाऱ्यांना अजिबात सोडले जाऊ नये, संबंधित प्राचार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी आणि त्या संस्थेची मान्यता रद्द करावी आणि ती त्वरित बंद करावी.” (Christian Conversion)
हेही पहा
Join Our WhatsApp Community