जम्मू-काश्मीरच्या (Kashmir) राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, त्या आदेशानंतर दोन कॅप्टन आणि दोन जवान शहीद झाले आहेत.
धर्मसालच्या बाजीमल भागात ही चकमक झाली. सध्या राजौरीमध्ये गोळीबार सुरुच आहे. सुरक्षा दलाने परिसरात घेराव आणि शोध मोहिम तीव्र केली आहे. जम्मू-काश्मीरमधील (Kashmir) राजौरी जिल्ह्यातील बाजीमल जंगलात झालेल्या भीषण चकमकीत लष्करातील दोन कॅप्टन आणि तीन जवान शहीद झाले असून आणखी तीन जवान जखमी झाले आहेत.
(हेही वाचा ICMR Research Corona Vaccine : कोरोना काळातील मृत्यूंचे गूढ कायम; ICMRच्या संशोधनात काय म्हटले आहे ?)
पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अनेकदा घडले आहे. पीर पंजालचे जंगल मोठे आव्हान जम्मू-काश्मीरमधील (Kashmir) पीर पंजालचे जंगल गेल्या काही वर्षांत अनेक चकमकींनंतर सुरक्षा दलांसाठी आव्हान ठरले आहे. दहशतवादी भौगोलिक स्थिती आणि घनदाट जंगलांचा फायदा घेत भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. गेल्या आठवड्यात राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.
Join Our WhatsApp Community