Manipur मध्ये CRPF जवानाने केली दोन सहकाऱ्यांची हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, ८ जखमी

98
Manipur मध्ये CRPF जवानाने केली दोन सहकाऱ्यांची हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, ८ जखमी
Manipur मध्ये CRPF जवानाने केली दोन सहकाऱ्यांची हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, ८ जखमी

मणिपूरमधील (Manipur ) इम्फाळ (Imphal) येथे एका सीआरपीएफ (CRPF) जवानाने त्याच्या दोन सहकाऱ्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी (13 फेब्रु.) रात्री केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) एका कॅम्पमध्ये घडली. (Manipur )

हेही वाचा-PM Narendra Modi व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा ; भेटीत नेमकं काय घडलं ?

या घटनेत इतर आठ सैनिक जखमी झाले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, ही घटना रात्री ८:२० च्या सुमारास इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लाम्फेल येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली. आरोपी जवान संजय कुमार हा 120व्या बटालियनमधील हवलदार होता. त्याने आपल्या सर्व्हिस राइफलने अचानकपणे गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याने सर्वप्रथम एक कॉन्स्टेबल आणि एका सब-इंस्पॅक्टरला निशाणा बनवले. यात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वतःवरही गोळी झाडली. (Manipur )

हेही वाचा-PM Narendra Modi २४ फेब्रुवारीला आसाम दौऱ्यावर

या हल्ल्यात इतर आठ सैनिकही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने इम्फाळ येथील रिजनल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. संबंधित घटनेची चौकशी केली जात आहे. लवकरच घटनेमागील कारणांचाही खुलासा करण्यात येईल, असे सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Manipur )

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
केंद्र सरकारने गुरुवारी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह (N. Biren Singh) यांच्या राजीनाम्याच्या चार दिवसांनंतर हा निर्णय घेण्यात आला. सिंह यांनी 9 फेब्रुवारी रोजी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. राज्यात 21 महिन्यांपासून (3 मे 2023) सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Manipur )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.