अजून ८५ जण बेपत्ता! नौदलाचे शर्थीचे प्रयत्न सुरूच! 

नौदलाने १७ मे पासून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.

तौक्ते वादळामुळे बॉम्बेहाय जवळील ओएनजीसीसह अन्य कंपन्यांच्या बार्ज वर काम करणाऱ्या सुमारे ६११ कामगारांची सुटका करण्यासाठी नौदलाने २ दिवसांपासून दिवस-रात्र बचाव कार्य सुरु केले आहे. यातील ओएनजीसीचे बार्ज पी-३०५ हे बुडाल्याने यावरील २७३ कामगारांना ताबडतोब वाचवण्याचे आव्हान होते. नौदलाने त्यातील १८८ जणांना सुरक्षितपणे बाहेर वाढले आहे. अजूनही ८५ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यासाठी नौदलाचे बचाव कार्य सुरूच आहे.

१७ मे पासून रेस्क्यू ऑपरेशन

नौदलाने १७ मे पासून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. तेव्हापासून आतापर्यंत १८८ कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे. नौदलाच्या आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता  या युद्धनौका, तसेच ग्रेटशिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. याशिवाय, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी जेएएल बार्जवर अडकलेल्या 137 कर्मचाऱ्यांचीही सुटका केली.

(हेही वाचा : ‘तौक्ते’तील नौदलाचे सर्वात मोठे बचावकार्य! नौदलाच्या अधिकाऱ्यांची कबुली!)

कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या टाकल्या 

आयएनएस कोचीवरुन १२५ जणांना समुद्र किनारी आणण्यात आले. तर ६५ जणांना इतर जहाजांद्वारे आणले जात आहे. अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन अद्यापही सुरु आहे. बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यातही तटरक्षक दलाला यश मिळाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here