अखेर ओएनजीसीचे ‘ते’ जहाज बुडाले, ८३ जण बेपत्ता! 

सध्या हेलिकॉप्टरच्या साहाय्यानेही बचाव कार्य सुरु असून वाचवण्यात येणाऱ्यांना थेट एअर लिफ्ट केले जात आहे. 

170

तौक्ते या वादळाने अरबी समुद्रात अक्षरशः थैमान घातले. या वादळामुळे आधीच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र असे असले तरी समुद्र किनारी बाँम्बे हायजवळील उत्तखननाचे काम करणाऱ्यांना परत बोलावून ते रिकामे करणे तितकेसे जमले नाही. त्याचा परिणाम म्हणून चक्रीवादळाच्या तडाख्यात बॉम्बे हायजवळच्या परिसरात ओएनजीसीचे ‘पी ३०५’ (पापा-३०५) हे मोठे जहाज सापडले. रविवारी सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतले. या जहाजामध्ये २६० लोक होते, त्यापैकी १७७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले, मात्र मंगळवारी, सकाळच्या सुमारास हे जहाज बुडाल्याने आता ८३ जण बेपत्ता असून त्यांना शोधण्याचे आव्हान नौदलासमोर आहे.

वादळातही सुरु होते उत्खनन! 

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात ‘बॉम्बेहाय’ असून, तेथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्र असून, याठिकाणी ‘ओएनजीसी’चं जहाज पी ३०५ उभे होते. दरम्यान, कोकण किनारपट्टी ओलांडून तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकले. त्यानंतर जहाज अपघातग्रस्त झाले. चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्याने जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज भरकटायला लागले. त्यानंतर जहाजावरून नौदलाला संदेश पाठवण्यात आला. या जहाजांच्या मदतीला आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलया होत्या, असे ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. यामध्ये  तटरक्षक दलाचे आयसीजी समर्थ हे नौकाही मदत कार्यासाठी पाठवण्यात आली. सध्या हेलिकॉप्टरच्या साहाय्यानेही बचाव कार्य सुरु असून बाहेर काढण्यात येणाऱ्यांची थेट एअर लिफ्ट केले जात आहे.

(हेही वाचा : मुंबईत आतापर्यंतच्या ‘मे’ महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.