सेवानिवृत्त भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस खुकरी बुधवारी म्हणजेच 73 व्या प्रजासत्ताक दिनी दीव प्रशासनाकडे सुपूर्द केले जाणार आहे. हे खुकरी जहाज संग्रहालय म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे. 32 वर्षांच्या सेवेनंतर गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी क्षेपणास्त्र कॉर्व्हेट रद्द करण्यात आले होते, असे नौदलाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
जहाजाचा होणार पुनर्जन्म
आयएनएस खुकरी या जहाजाला सेवेदरम्यान पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही ताफ्यांचा भाग असण्याचा गौरव प्राप्त झाला होता. जहाज कधीच मरत नाही असं म्हणतात, म्हणूनच या जहाजाचा नव्या अवतारात पुनर्जन्म होणार आहे. लवकरच हे जहाज संग्रहालय बनणार आहे, असं नौदलाने सांगितले आहे.
या नावाचे दुसरे जहाज
आयएनएस खुकरी हे नाव असणारे नौदलाचे दुसरे जहाज आहे, पहिले जहाज 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान दीवच्या किनाऱ्यावर नष्ट झाले होते, म्हणून दिव येथे या खुकरी जहाजात संग्रहालय बनवण्यात येणार आहे. या संग्रहालयात दिवंगत कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला (महा वीर चक्र पुरस्कारप्राप्त) यांच्या नावे त्या जहाजाच्या शूर दलाला अमर करण्यात आले आहे, असं नौदलाने सांगितले.
( हेही वाचा :अभिनंदन… युवराज सिंगला पुत्ररत्न )
32 वर्षांनंतर सेवानिवृत्त
आयएनएस खुकरी हे स्वदेशी बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र कॉर्वेट्स होते. 32 वर्षांच्या सेवेनंतर गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी क्षेपणास्त्र कॉर्व्हेट सेवानिवृत्त करण्यात आले होते,कॉर्व्हेट 23 ऑगस्ट 1989 रोजी Mazagon Dock Shipbuilders द्वारे बांधले गेले होते.
Join Our WhatsApp Community