लग्नानंतर 15 महिन्यांतच पती हुतात्मा; लेफ्टनंट होऊन पत्नीने केले स्वप्न पूर्ण

15 जून 2020 मध्ये लडाखच्या गलवान खो-यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत लान्स नायक दीपक सिंह हुतात्मा झाले. हुतात्मा दीपक सिंह यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. आता हुतात्मा दीपक सिंह यांच्या वीरपत्नी रेखा सिंह या भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून भरती झाल्या आणि आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

देशप्रेमाच्या भावनेतून सैन्यात भरती होण्याची इच्छा

रीवा जिल्ह्यातील हुतात्मा लान्स नायक दीपक सिंग यांच्या पत्नीची भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. आता वैद्यकीय औपचारिकचा पूर्ण झाल्यानंतर, ऑफिसर्स ट्रेनिंग अकाॅडमी, चेन्नई येथे त्यांचे प्रशिक्षण होणार आहे. लग्नानंतर अवघ्या 15 महिन्यांतच रेखा सिंह यांच्या पतीला वीरमरण आलं. वीरपत्नी रेखा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हौतात्म्याचे दु:ख आणि देशप्रेमाच्या भावनेतूनच मी शिक्षिकेची नोकरी सोडून सैन्यात अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. पण ते सोपं नव्हतं. यासाठी नोएडा येथे जाऊन सैन्यात भरती होण्यासाठी प्रवेश परीक्षेची तयारी केली आणि प्रशिक्षण घेतले. शारीरिक प्रशिक्षणही घेतले, मात्र त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही.

( हेही वाचा: राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलण्यास मनाई असताना दिला बाईट )

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सैन्यात होणार भरती

मी हिंमत हरली नाही आणि सैन्यात भरती होण्याची पू्र्ण तयारी करत राहिले. दुस-या प्रयत्नात केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आणि माझी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदासाठी निवड झाली. भारतीय लष्करात लेफ्टनंट पदासाठीचे प्रशिक्षण 28 मे पासून चेन्नईत सुरु होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, एका वर्षात त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून काम करावे लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here