नौदलात स्वदेशी बनावटीची ‘दुनागिरी’ युद्धनौका दाखल

141

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज, शुक्रवारी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता दौऱ्यावर असून त्यांनी हुगळी नदीत भारताची स्वदेशी बनावटीची दुनागिरी युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द केली आहे. INS दुनागिरी ही युद्धनौका राजनाथ सिंह यांच्या हस्ते लाँच करण्यात आली. ही युद्धनौका गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स म्हणजेच कोलकाता येथील जीआरएसई शिपयार्डने बनवली आहे. भारतीय नौदलात ही युद्धनौका दाखल झाल्याने भारताची समुद्रातील ताकद वाढली आहे. दुनागिरी या युद्धनौकेतील 75 टक्के शस्त्रे, उपकरणे आणि यंत्रणा स्वदेशी युद्धनौकेची रचना नौदलाच्या नौदल संचालनालयाने तयार केली आहे.

(हेही वाचा – Har Ghar Ujala: ‘या’ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र उजळला!)

INS दूनागिरी ही प्रोजेक्ट-17A ची चौथी युद्धनौका आहे, जी आज लॉन्च करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत नौदलासाठी एकूण 7 शिवालिक क्लास फ्रिगेट्स बांधण्यात येणार आहेत. यापैकी 4 मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तर उर्वरित 3 जीआरएसई येथे बांधण्यात येत आहेत. माझगाव डॉकयार्डने यापूर्वीच या वर्गाच्या 2 युद्धनौका समुद्रात सोडल्या आहेत. गेल्या महिन्यातच या क्लासची तिसरी युद्धनौका उदयगिरी दाखल झाली. जीआरएसईची ही दुसरी युद्धनौका असून या 7 ही युद्धनौकांना देशातील विविध पर्वतरांगाच्या नावावरुन नावे देण्यात आली आहेत.

काय आहे दुनागिरीची वैशिष्ट्ये?

  • दुनाहिरीसह प्रोजेक्ट 17A ची सर्व फ्रिगेट्स शिवालिक क्लास युद्धनौकांसाठी फॉलो-ऑन आहेत.
  • सर्वांमध्ये यापूर्वीच्या तुलनेत उत्तम स्टेल्थ फिचर्स, प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली बसववण्यात आली आहेत.
  • लॉन्च केलेली दूनागिरी युद्धनौका नौदलाच्या जुन्या दूनागिरी ASW फ्रिगेटचे रूप आहे.
  • जुने फ्रीगेट 33 वर्षे सेवा पूर्ण करून 2010 मध्ये सेवानिवृत्त झाले होते.
  • त्यानंतर पुन्हा लॉन्च करण्यात आलेले नवीन फ्रीगेटचे नाव त्याच्याच नावावर ठेवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.