चालू कार्यक्रमात झाली ‘POK’ ची मागणी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले…

370 कलम हटवल्यानंतर आता भारताचा अविभाज्य भाग असलेले पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करुन घेण्याची मागणी भारतीयांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठे विधान केले आहे.

एका कार्यक्रमात राजनाथ सिंह भाषण करत असताना उपस्थितांनी पाकव्याप्त काश्मीरची मागणी करणा-या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी पाकव्याप्त काश्मीर(POK) आपण घेऊनच राहू, थोडा धीर धरा, असं विधान राजनिथ सिंह यांनी केलं आहे.

काय म्हणाले सिंह?

हिमाचल प्रदेशातील जयसिंगपूरच्या कांगडा येथे जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी राजनाथ सिंह उभे होते. त्यावेळी जनसमुदायाकडून पाकव्याप्त काश्मीर हवा, अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली. त्यावेळी मंचावरुनच राजनाथ सिंह यांनी सूचक विधान केले. धीर धरा,संयम बाळगा, पाकव्याप्त काश्मीर आपण घेऊनच राहू, असे सिंह यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा होत आहे.

(हेही वाचाः ‘इथे आमची गरजच काय?’, सीबीआय म्हणते या राज्यात एकही भ्रष्टाचाराची तक्रार नाही)

दहशतवादाचा नायनाट केला जाईल

भाजपकडून जे सांगितलं जातं ते सत्यातही उतरवण्यात येतं. 370 कलम हटवल्यानंतर पलिकडून होणा-या आतंकवादी कारवायांमध्ये चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे देशातून दहशतवादाचा कायमस्वरुपी नायनाट केला जाईल, असे मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो, असेही सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here