हवाई दलामुळे देशाची हवाई सुरक्षा कायम अबाधित – राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या प्रमुख रडार स्टेशनला सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी एकात्मिक हवाई कमांड आणि नियंत्रण प्रणाली (IACCS) चे कामकाज पाहिले. ही नियंत्रण प्रणाली भारतीय हवाई दलाच्या नेटवर्क केंद्रीकरणाकडे सुरू असलेल्या वाटचालीचा मुख्य आधार असून संचालनाची मुख्य प्रवर्तक आहे.

शांततेच्या काळातील कमांड आणि नियंत्रण प्रणालीच्या बारकाव्यांबद्दल देखील संरक्षण मंत्र्यांना माहिती देण्यात आली, ज्यामध्ये दैनंदिन आधारावर तसेच मोठ्या कार्यक्रमांदरम्यान संवेदनशील क्षेत्रांचे हवाई संरक्षण सुनिश्चित करणे समाविष्ट आहे. देशाची हवाई सुरक्षा कायम अबाधित राखल्याबद्दल, संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात, हवाई दल योद्ध्यांचे कौतुक केले.

(हेही वाचा – राफेलच्या चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

IACCS या मजबूत प्रणालीच्या कार्यपद्धतीच्या डेटाबेसमध्ये एकाच माहितीच्या अनेक प्रति (redundancies) समाविष्ट केलेल्या आहेत, ज्या देशभरातील त्यांच्या केंद्रांचे अखंड संचलन सक्षम करतात. या भेटीदरम्यान, संरक्षणमंत्र्यांना देशभरातील अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या विविध नेटवर्क ऑपरेशन्सची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामध्ये लढाऊ, मालवाहू आणि रिमोट द्वारे नियंत्रित विमानांचे नेटवर्क आणि संचलन समन्वय यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here