Defense Expo 2024: लष्कर प्रमुखांनी महाराष्ट्र एमएसएमई ‘डिफेन्स एक्स्पो 2024’ ला भेट दिली

संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्र हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या उत्पादनासाठी धोरण निश्चित करणारे, देशातील पहिले राज्य होते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

275
Defense Expo 2024: लष्कर प्रमुखांनी महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो 2024 ला भेट दिली
Defense Expo 2024: लष्कर प्रमुखांनी महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो 2024 ला भेट दिली

देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी, 26 फेब्रुवारी 2024 (Defense Expo 2024) रोजी पुण्यात मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे आयोजित महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्रविषयक एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) एक्स्पो 2024 या प्रदर्शनाला भेट दिली. महाराष्ट्र राज्य सरकारने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील एमएसएमई उद्योग, खासगी कंपन्या, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ)च्या प्रयोगशाळा तसेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रम (डीपीएसयू) यांच्यातर्फे विकसित स्वदेशी क्षमता आणि नवोन्मेष यांचे दर्शन घडवण्यात आले आहे.

याप्रसंगी जनरल मनोज पांडे यांनी एमएसएमई उद्योगांचे संचालक तसेच विद्यार्थी यांना उद्देशून बीजभाषण केले आणि ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था, औद्योगिक विकास, निर्यात आणि थेट परदेशी गुंतवणूकविषयक आकर्षकता वाढवणे यात महत्त्वाचे योगदान देणारे राज्य असल्याबद्दल महाराष्ट्राला श्रेय दिलेच पाहिजे. संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्र हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या उत्पादनासाठी धोरण निश्चित करणारे, देशातील पहिले राज्य होते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्र राज्याने हवाई उड्डाण तसेच संरक्षण विषयक उत्पादनाला प्रोत्साहन योजनेतील पॅकेज मधील महत्त्वाचे विषय म्हणून देखील घोषित केले. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, देशातील विमाने, जहाजे आणि बोटी यांच्या निर्मितीमध्ये 20% हून अधिक तसेच देशात उत्पादन होत असलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याच्या एकूण साठ्यापैकी 30% साठ्याच्या निर्मितीचे योगदान एकटे महाराष्ट्र (Maharashtra) राज्य देत आहे. ही आकडेवारी संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासंदर्भात या राज्याची धोरणात्मक दृष्टी दर्शवते.

(हेही वाचा – Kolhapur Mahalaxmi Temple : जाणून घ्या महालक्ष्मी मंदिरातील ‘या’ प्रसिद्ध पाच उत्सवांबद्दल )

भारताने केलेल्या आर्थिक प्रगतीवर अधिक भर देत लष्कर प्रमुख म्हणाले की, देशात आता अधिक ग्राहकविषयक विपुलता, अधिक उत्तम जीवनशैली, अधिक प्रमाणात साक्षर झालेला वर्ग आणि नागरिकांच्या आकांक्षा उंचावलेल्या दिसत आहेत. धोरणात्मक सुधारणा, कौशल्य मिळवण्यासाठीचे उपक्रम, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, डिजिटल क्षमता, आघाडीची उद्योजकता यांच्या बाबतीत सरकारी संस्था तसेच सशस्त्र दलांनी उचललेल्या पावलांची त्यांनी प्रशंसा केली आणि ते म्हणाले की, यातून शाश्वत विकासाप्रती तसेच पुरवठा साखळीतील विश्वासार्ह भागधारक होण्याप्रती देशाची वचनबद्धता दिसून येते.

“आपल्या क्षमतेच्या विकासाबाबतच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून,भारतीय लष्कराने एमएसएमई उद्योग आणि स्टार्ट अप उद्योग परिसंस्था या दोन्हींचा उपयोग करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

संरक्षण उत्कृष्टता (IDEX) खरेदी प्रक्रियेअंतर्गत, सर्व प्रकल्प स्टार्ट अप्स उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण करणे अनिवार्य आहे, असेही लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.