“भविष्यातील संघर्ष अनपेक्षित सज्ज राहणे आवश्यक!” पहिल्या नौदल परिषदेत संरक्षणमंत्र्यांचा सूचक इशारा

154

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 6 मार्च 2023 रोजी भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर आयोजित नौदल कमांडर्स परिषदेत भारतीय नौदलाच्या क्षमतेचा आढावा घेतला. त्यांनी नौदल कमांडर्सशी संवाद साधला आणि देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी बहुआयामी मोहिमा हाती घेण्यास सांगितले.

( हेही वाचा : अखेर संप मिटला! पुणेकरांची गैरसोय टळली, PMPML बसेस मार्गस्थ)

“संपूर्ण किनारपट्टीवर सतत दक्षता बाळगली पाहिजे”

नौदल कमांडर्सना संबोधित करताना, राष्ट्रीय हितांचे रक्षण केल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी नौदलाचे कौतुक केले. “भविष्यातील संघर्ष अनपेक्षित असतील. निरंतर विकसित होत असलेल्या जागतिक व्यवस्थेने प्रत्येकाला पुन्हा धोरण आखण्यास भाग पाडले आहे. उत्तर आणि पश्चिम सीमेवर तसेच संपूर्ण किनारपट्टीवर सतत दक्षता बाळगली पाहिजे. भविष्यातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज असणे आवश्यक आहे,” असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

सामाजिक आणि आर्थिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षित सीमा ही पहिली गरज असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्या जोमाने आणि उत्साहाने ‘अमृत काल’ मध्ये वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले.

“इतरांवर अवलंबून न राहता संपूर्णपणे आत्मनिर्भर व्हावे” 

भारतासारख्या विशाल देशाने सुरक्षेसाठी इतरांवर अवलंबून न राहता संपूर्णपणे आत्मनिर्भर होण्याच्या गरजेचा संरक्षणमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. चार सकारात्मक स्वदेशीकरण याद्यांची अधिसूचना, एफडीआय मर्यादेत वाढ आणि एमएसएमईसह भारतीय विक्रेत्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे यासह संरक्षणात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी सरकारने उचललेल्या अनेक पावलांची त्यांनी यादी सांगितली.

आयएनएस विक्रांत कार्यान्वित झाल्याबद्दल त्यांनी सांगितले की, भारताच्या नौदलाची रचना आणि विकास आश्वासक टप्प्यावर आहे आणि आगामी काळात आणखी प्रगती होईल, हा विश्वास आणखी दृढ झाला आहे.

संरक्षणमंत्र्यांनी अनुभवलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये जटिल विमानवाहू वाहक आणि फ्लीट ऑपरेशन्स, जहाजे आणि विमानांद्वारे शस्त्रास्त मारा आणि समुद्रात पुनर्भरणाचा समावेश होता. याशिवाय, स्पॉटर ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड लाईफबॉय आणि फायर फायटिंग बॉटसह स्वदेशी उत्पादनांचे प्रात्यक्षिक सुद्धा संरक्षणमंत्र्यांनी पाहिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.