संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान, भारतीय नौदलाच्या ‘पी8आय’ या लांब पल्ल्याच्या सागरी टेहळणी पाणबुडीविरोधी लढाऊ विमानातून उड्डाण केले. या उड्डाणादरम्यान संरक्षण मंत्र्यांना, अत्याधुनिक मिशन सूट आणि सेन्सर्सचा वापर करून लांब पल्ल्यापर्यंत टेहळणी, इलेक्ट्रॉनिक युद्ध, प्रतिमा बुद्धिमत्ता, पाणबुडीविरोधी लढाऊ मोहिमा तसेच शोध आणि बचाव क्षमतांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
(हेही वाचा – अवसरवादी ताई तुम्हाला काय उत्तर द्यायचे? दीपाली सय्यद यांना मनसेने सुनावले )
पी8आय विमानाचा समावेश 2013 पासून नौदलात करण्यात आल्यानंतर, हिंद महासागर क्षेत्रात (आयओआर ) भारतीय नौदलाच्या सातत्यपूर्ण टेहळणी मोहिमांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या लढाऊ विमानाच्या कर्मचारी वर्गात दोन वैमानिक आणि तीन महिला अधिकाऱ्यांसह सात नौदल हवाई संचालन अधिकाऱ्यांचा समावेश होता.
Join Our WhatsApp Community