-
ऋजुता लुकतुके
संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी युद्ध सामुग्री खरेदीसाठी ४०,००० कोटी रुपयांच्या खरेदीचे करार केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे सगळे करार हे ‘मेक-इन-इंडिया’ धोरणा अंतर्गत केलेले आहेत. त्यामुळे देशांतर्गत कंपन्यांना याचा लाभ मिळणार आहे. संरक्षण क्षेत्रातील हे पाच करार आहेत. पहिला मोठा करार हिंदुस्थान एरोनॉटिकल्स कंपनीबरोबरचा आहे. त्यांच्याकडून सरकार मिग २९ विमानांसाठी एअरो इंजिन बसवून घेणार आहे. तर दुसरा मोठा करार एल अँड टी कंपनीबरोबरचा आहे. तर उर्वरित दोन करार हे ब्राम्होस कंपनीबरोबरचे आहेत. (Defence Ministry Procurement)
‘या करारांमुळे देशाचं परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होईल. देशाचं परकीय चलन वाचेल आणि महत्त्वाचं म्हणजे संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होऊ,’ असं संरक्षण मंत्रालयाने या करारांची माहिती देताना म्हटलं आहे.
भारत रशियाकडून नियमितपणे मिग प्रजातीची लढाऊ विमानं खरेदी करतो. या विमानांचं तंत्रज्ञान रशियाने भारताबरोबर शेअर केलं आहे. ते वापरून आरडी३३ इंजिनं बसवण्याचं काम एकएएल ही भारतीय कंपनी करणार आहे. मिग विमानं सुरू ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. हा करार ५,२४९ कोटी रुपयांचा आहे. तर एल एनटी कंपनीबरोबरही दोन महत्त्त्वाचे करार करण्यात आले आहेत. (Defence Ministry Procurement)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : हे सरकार विकासाच्या बाबतीत कोणतंही राजकारण आणू इच्छित नाही)
एलअँडटी कंपनीबरोबरचे दोन करार हे १३,३६९ कोटी रुपयांचे आहेत. ही कंपनी भारतीय संरक्षण दलासाठी क्लोज-इन वेपन्स यंत्रणा उभारणार आहे. तसंच उच्च क्षमतेची रडार यंत्रणाही तयार करणार आहे. त्याचबरोबर ब्राम्होस एअरोस्पेस कंपनीबरोबर संरक्षण मंत्रालयाने ब्राम्होस क्षेपणास्त्रांसाठी १९,५१९ कोटींचा करार केला आहे. याच कंपनीबरोबर आणखी एक ९८८ कोटी रुपयांचा करार आहे तो युद्ध नौकांमध्ये ही क्षेपणास्त्र बसवण्यासाठी. (Defence Ministry Procurement)
संरक्षणात ‘आत्मनिर्भर भारत’
५,२४९ कोटी रु. – मिग विमानांसाठी आरडी २९ इंजिन – हिंदुस्थान एअरोनॉटिकल्स लिमिटेड
७,६६९ कोटी रु. – क्लोज-इन वॉर सिस्टिम्स – लार्सन अँड टुब्रो लिमिटेड
५,७०० कोटी रु. – उच्च क्षमतेची रडार यंत्रणा – लार्सन अँड टुब्रो लिमिटेड
१९,५१९ कोटी रु. – ब्राम्होस क्षेपणास्त्रं विमानात बसवणे – ब्राम्होस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड
९८८ कोटी रु. – युद्धनौकांमध्ये ब्राम्होस क्षेपणास्त्रे – ब्राम्होस एअरोस्पेस लिमिटेड
हेही पहा –
Join Our WhatsApp Community