अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ओव्हरटाईम वेतन देण्याबाबत भाष्य केलं आहे. दोन्ही अंतराळवीर ५ जून २०२४ रोजी नासाच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर गेले होते. हे अभियान ८ दिवसांचे होते, परंतु अंतराळयानाच्या थ्रस्टर्समध्ये समस्या आल्यामुळे ते ९ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकून राहिले. एलन मस्क यांच्या अंतराळयानाच्या मदतीने त्यांना १९ मार्च रोजी परत आणण्यात आले. (Donald Trump)
हेही वाचा-World Climate Day : निसर्ग आणि मानवी जीवन संकटात
याबद्दल ट्रम्प (Donald Trump) यांना विचारण्यात आले की, या ओव्हरटाईमसाठी ते दोन्ही अंतराळवीरांना अतिरिक्त पगार देणार का? यावर ट्रम्प म्हणाले, “याबद्दल कोणीही माझ्याशी कधीच बोलले नाही. गरज पडल्यास मी माझ्या खिशातून पैसे देईन. त्यांना जे सहन करावे लागले त्याच्यापेक्षा ते जास्त नाही.” (Donald Trump)
हेही वाचा-Google Pixel 9a : गुगल पिक्सेल ९ए भारतात लाँच; ४९,९९९ रुपये किंमत
नासाच्या अंतराळवीरांना सरकारी कर्मचारी मानले जाते. त्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगार मिळतो. विस्तारित मोहिमांसाठी कोणतेही अतिरिक्त वेतन नाही. ज्यामध्ये ओव्हरटाईम, वीकेंड किंवा सुट्ट्या यांचा समावेश आहे. अंतराळवीरांच्या प्रवास, राहण्याचा आणि जेवणाचा खर्च नासा उचलते. याशिवाय, ते छोट्या दैनंदिन खर्चासाठी अतिरिक्त ५ डॉलर्स (४३० रुपये) देखील देते. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे वेतन अनुक्रमे $९४,९९८ (रु. ८१,६९,८६१) आणि $१२३,१५२ (रु. १,०५,९१,११५) आहे. याशिवाय, त्यांना अंतराळात घालवलेल्या एकूण २८६ दिवसांसाठी $१,४३० (रु. १,२२,९८०) मिळतील. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community