अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प (Donald Trump) यांनी रविवारी इराणला थेट धमकी दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार येत्या काही दिवसात अमेरिकेबरोबर अणु करार करा अन्यथा बॉम्बहल्ले आणि शुल्क वाढीला सामोरे जा असा कडक इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत इराण आणि अमेरिकेच्या अधिकार्यांमध्ये याबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती दिली मात्र याबद्दल अधिक खुलासा केला नाही. (Donald Trump)
हेही वाचा-“…तर देवेंद्र फडणवीस यांना आमचा पाठिंबा” ; Raj Thackeray काय म्हणाले ?
गेल्या आठवड्यात इराणने अमेरिकेचा थेट चर्चेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे. “जर त्यांनी करार केला नाही, तर बॉम्ब हल्ले होतील. त्यांनी यापूर्वी कधीही न पाहीलेले बॉम्बहल्ले होतील,” असे ट्रम्प (Donald Trump) यांनी एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितले. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी कर वाढीबद्दल देखील इराणला इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, “जर त्यांनी करार केला नाही तर शक्यता आहे की मी त्यांच्यावर दुय्यम कर लावेल, जसेकी मी चार वर्षांपूर्वी केले होते.” (Donald Trump)
हेही वाचा- Progressive : पुरोगाम्यांची प्रतिगामी सभा!
इराणाचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देशाच्या धोरणाचा पुनरुच्चार करताना सांगितले की, “आम्ही थेट वाटाघाटी (अमेरिकेशी) फेटाळल्या आहेत, पण इराण नेहमीच अप्रत्यक्ष वाटाघाटींमध्ये सहभागी झाला आहे, आणि आता देखील सर्वोच्च नेत्याने अप्रत्यक्ष वाटाघाटी सुरू राहतील यावर भर दिला आहे.” असे म्हटले आहे. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community