भारत आणि अमेरिका यांच्यातील टू प्लस टू बैठकीसाठी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे एनएसए मंत्री भारतात येऊन गेले. भारतात आल्यावर त्यांनी भारताचे रशियाशी असलेल्या संबंधांवरुन धमक्या देण्याचे काम केले. आता यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी थेट अमेरिकेत जाऊन सडेतोड उत्तर दिले आहे. अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या या राजेशाही थाटाला जशास तसे उत्तर देणारे जयशंकर हे पहिलेच मंत्री असल्याचे नेटक-यांचे म्हणणे आहे.
जयशंकर यांनी कडक शब्दांत सुनावले
भारताने रशियाकडून एस -400 ही मिसाईल खरेदी केली आहे. युक्रेन आणि रशिया युद्धामुळे अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाकडून मिसाईल खरेदी केल्यास भारतावर निर्बंध घालण्याची धमकी अमेरिका वारंवार देत होता. अमेरिकेने CAATSA कायदा बनवला आहे. यावर भारताने प्रत्युत्तर देत म्हटले की, भारताच्या सुरक्षेसाठी जे गरजेचे आहे ते भारत करणारच. अमेरिकेला जे काही निर्बंध लादायचे आहेत ते लादू देत. भारताला त्याची फिकीर नाही. अशा कडक शब्दांत जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले आहे.
( हेही वाचा: ‘सिल्वर ओक’वरील हल्ला; आंदोलकांना मद्य कोणी पुरवले? )
जयशंकर यांचा अमेरिकेला इशारा
या बैठकीत ब्लिंकन यांनी भारतातील मानवाधिकारांवर भाष्य केले. भारताच्या मानवाधिकारांवर प्रश्न उपस्थित केले. यावर जयशंकर यांनी अमेरिकेला आम्हालाही बोलण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. आम्ही या मुद्द्यावर शांत बसणार नाही. अमेरिकेच्या मानवाधिकारांबाबत आमचेही मत आहे आणि ते आम्ही योग्य मंचावर नक्की मांडू, असा इशाराच जयशंकर यांनी अमेरिकेला दिला आहे.
Join Our WhatsApp Community