संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) च्या प्रकल्पांवर केंद्र सरकारने मिशन मोडवर काम केले आहे. आजमितीला डीआरडीओ 55 प्रकल्पांवर काम करत असून त्यासाठी एकूण 73,942.82 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.
डेकोइज, आण्विक संरक्षण तंत्रज्ञान, एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी), कॉम्बॅट सूट, प्रोपल्शन सिस्टीम, एअर ड्रॉपेबल कंटेनर, टॉर्पेडो, लढाऊ विमान, क्रूझ क्षेपणास्त्र, मानवरहित हवाई वाहन, AEW&C विमान प्रणाली, गॅस टर्बाइन इंजिन, असॉल्ट रायफल, वॉरहेड, लाइट मशीन गन, रॉकेट, प्रगत इतर वाहनाने वाहून नेता येणारी आर्टिलरी गन सिस्टम (ATAGS), इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल कमांड, ऑर्डनन्स डिस्पोजल सिस्टीम, टॅक्टिकल रेडिओ, EW सिस्टीम,रडार्स,जीवन रक्षक प्रणाली, भौगोलिक माहिती प्रणाली, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, जहाजविरोधी क्षेपणास्त्र, अँटी एअरफील्ड वेपन, ग्लाईड बॉम्ब, सिम्युलेटर इत्यादी क्षेत्रात हे प्रकल्प कार्यरत आहेत.
(हेही वाचा कसबापेठ आणि चिंचवड विधानसभेसाठी भाजपाची नावे निश्चित; कुणाला मिळणार संधी?)
Join Our WhatsApp Community