जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) कुलगाममधील (Kulgam) आदिगम देवसर भागात सुरक्षा दल (Security Forces) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक सुरू आहे. लष्कराचे तीन जवान आणि एक सहायक अधीक्षक जखमी झाले आहेत. चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, सुरक्षा दलाकडुन दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी शनिवारी सकाळी ७.०५ वाजता ट्विटरवर पोस्टद्वारे या चकमकीची माहिती दिली होती. पोलीस आणि लष्कराने संयुक्त मोहिमेचा भाग म्हणून आदिगाममध्ये शोधमोहीम राबविल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, परिणामी चकमक झाली. (Jammu-Kashmir)
विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या आधी ही चकमक
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या आधी ही चकमक झाली. विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 18 सप्टेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर रोजी गंदरबल, बडगाम, श्रीनगर आणि जम्मू विभागातील सहा जिल्हे, राजौरी, रियासी आणि पूंछ येथे झाले. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे, तर मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. केंद्रशासित प्रदेशात दहा वर्षांच्या कालावधीनंतर विधानसभेच्या निवडणुका होत असून कलम ३७० रद्द केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community